आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Verdict In December 16 Gangrape Case Involving Minor Deferred Till August 19 By Juvenile Justice Board

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्‍लीतील सामुहिक बलात्‍कारः अल्‍पवयीन आरोपीच्‍या शिक्षेवर सुनावणी लांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्‍ल्‍ीत गेल्या वर्षी 16 डिसेंबरला 23 वर्षांच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील बालगुन्‍हेगाराच्‍या शिक्षेवरील सुनावणी पुन्‍हा लांबणीवर टाकण्‍यात आली आहे. याप्रकरणाची सुनावणी आता 19 ऑगस्‍टला होणार आहे. बालगुन्‍हेगार न्‍यायिक मंडळापुढे (ज्युवेनाईल जस्‍टीस बोर्ड) आज (सोमवारी) सुनावणी होणार होती.

दिल्‍लीतल घडलेल्‍या या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. महत्त्वाचे म्‍हणजे, याप्रकरणातील अल्‍पवयीन आरोपीने पीडितेवर सर्वाधिक क्रूर अत्‍याचार केले होते. त्‍याने तिच्‍यावर दोन वेळा बलात्‍कार करुन गुप्‍तांगात लोखंडी रॉड टाकला होता. त्‍यामुळेच तिच्‍या आतड्यांना जीवघेणी दुखापत झाली होती. बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपी राम सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश आणि अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती; परंतु, राम सिंह याने 11 मार्चला तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अल्पवयीन आरोपीविरुद्ध बालगुन्‍हेगार न्‍याय मंडळात खटला सुरु आहे. सुनावणी पूर्ण झाली असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. मंडळाने हा आरोपी अल्‍पवयीनच असल्‍याचा निर्वाळा दिला होता. त्‍यामुळे त्‍याला मोठी शिक्षा होण्‍याची शक्‍यता कमीच असल्‍याचे तज्‍ज्ञांचे मत आहे.

एका पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर 16 डिसेंबरला चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्रास बेदम मारहाण करून धावत्या बसबाहेर फेकून देण्यात आले होते. पीडित तरुणीचा 29 डिसेंबर रोजी सिंगापूर येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला होता.