आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon New Cotton Industry Policy, Divya Marathi

नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच; वाराणसी विणकरांसाठी प्रकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाराणसी येथील विणकरांसाठी मोठ्या प्रकल्पाची घोषणा करणार आहेत. भारतातील इतर राज्यांतील विणकरांसमोरही अनेक अडचणी असून, देशाचे नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. वाराणसी येथील प्रकल्पाची पूर्वतयारी झाली असून १३ व १४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान या प्रकल्पाची औपचारिक घोषणा करणार आहेत. कापड उद्योगातील समस्यांमुळे इतरत्र रोजगार शोधणा-या विणकरांना एकत्रित आणण्यासाठी नवे राष्ट्रीय कापडोद्योग धोरण जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी वस्त्रोद्योगातील लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.

हँडलूम उत्पादनांना देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्तीत जास्त संधी मिळण्यासाठी हँडलूम काँप्लेक्सही उभारण्यात येणार आहेत. देशातील हँडलूम उद्योगात सध्या ४३.३१ लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.