आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीफ'च्या आश्वासनानंतर विश्व हिंदू परिषदेने मागितला गोव्याचे CM पर्रीकर यांचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. - Divya Marathi
विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली/पणजी- विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोव्यात बीफचा तुटवडा जाणवू देणार नाही असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्यानंतर विश्व हिंदू परिषदने ही मागणी केली आहे.
 
 
राज्यात बीफचा तुटवडा भासू नये म्हणून कर्नाटक आणि अन्य भागांतून बीफ आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. बीफचा तुटवडा भासू दिला जाणार नाही, असे आश्वासन पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिले होते. पर्रीकर यांच्या या विधानावर वाद सुरु झाला. या वक्तव्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...