आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या नाराजीनंतरही 'घर वापसी' च्या मुद्यावर विहिंपची अडेल भूमिका कायम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - विश्‍व हिंदू परिषद (विहिंप) च्या कार्यकर्त्यांना देशभरात सुरू असलेले 'घर वापसी' (धर्मांतर) कार्यक्रम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश कार्यकर्त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मिळालेल आहेत. मात्र, तरीही विहिंप नेत्यांच्या वक्तव्यावरून त्यांची भूमिका अडेल असल्याचे समजते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाराजीनंतर देशभरातील कार्यकर्त्यांना धर्मांतराचे कार्यक्रम टाळण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. पण त्यामुळे विहिंप अध्‍यक्ष प्रवीण तोगडिया नाराज असल्याचे म्हटले जात आहे. विहिंप कार्यकर्त्यांना 'घर वापसी' संदर्भात कोणतेही नवे निर्देश देण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे असे कार्यक्रम सुरू करण्याबाबतही कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

मोदी नाराज
शनिवारी गुजरातच्या वलसाडमध्ये अरनाई गावात विहिंप कार्यकर्त्यांनी 500 ख्रिस्तींचे धर्मांतर करत त्यांना हिंदु धर्मात प्रवेश दिला. त्यावर मोठा वाद सुरू झाला आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व हिंदु परिषदेच्या नेत्यांकडे नाराजी वर्तवली असल्याचे सांगितले जात आहे.
विहिंप अजूनही भूमिकेवर अडून
असे असले तरी, विहिंप अजूनही अशा कार्यक्रमांबाबत भूमिकेवर अडून आहे. विहिंप नेत्यांनी दावा केला आहे की, रविवारी मध्यप्रदेशात 6000 धर्मांतरित हिंदुंच्या 'घर वापसी' चा कार्यक्रम घेण्यात आला. केरळच्या अलापुज्‍जाध्येही सुमारे 30 दलित ख्रिश्चनांना हिंदु बनवण्यात आळे. गुजरात विहिंपच्या एका नेत्याच्या मते त्यांची संघटना समाजात तिरस्कार पसरू नये याची काळझी घेऊन सरकारच्या कोणत्याही दबावाचा विचार न करता असे कार्यक्रम सुरू ठेवणार आहे.