आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिंपचे नेते अशोक सिंघल यांचे निधन, आज दिल्लीत अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अयोध्येत राममंदिर उभारणी आंदोलनाचे अध्वर्यू, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी दुपारी गुडगावमधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. श्वासोच्छ‌्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना १४ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल केलेे होते. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जातील.

संघाशी ७३ वर्षे संबंध
२ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेल्या सिंघल यांचा १९४२ पासून संघाशी संबंध आला. १९८० मध्ये त्यांना विश्व हिंदू परिषदेत पाठवले. तेथे ते संयुक्त सरचिटणीस झाले. १९८४ मध्ये ते सरचिटणीस झाले आणि कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोहोचले.