आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VHP Leader Ashok Singhal Called Asaram As A Victim, He Should Get Bail

बलात्कारातील आरोपी आसाराम यांची राजनाथ सिंहांकडून स्तुती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोळा वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेले स्वंयघोषित संत आसाराम यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांनी मुक्तकंठाने स्तूती केली आहे. आसाराम यांच्या संस्थेच अहमदाबाद येथून प्रकाशित होणारे 'ऋषिप्रसाद' या नियतकालिकात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मीडिया ट्रायलमुळे कोर्टावर दबाव येत असल्याचा लेख लिहिला आहे. आसाराम यांच्या या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर राजनाथसिंह, जेटली आणि सिंघल यांच्या छायाचित्रासह त्यांचे कोट प्रकाशित करण्यात आले आहे. सिंघल यांच्या हवाल्याने यात लिहिले आहे, '76 वर्षांच्या बापूजींना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात फसवून त्यांना यातना दिल्या जात आहेत. अशा षड्यंत्रानंतरही देशात संतांबद्दलची श्रद्धा कमी झालेली नाही. बापूजींना खूप यातना दिल्या गेल्या आहेत. त्यांना जामीन मिलाळा पाहिजे.'
ऋषिप्रसाद नियतकालिकाच्या पृष्ठ क्रमांक 10 वर राजनाथसिंह यांनी म्हटले आहे, 'मला हे ऐकून आनंद झाला, की पुज्य संत श्री आसाराम बापू यांच्या प्रेरणेने 14 फेब्रुवारी रोजी मातृ-पितृ पूजन दिवस देशभरात साजरा होत आहे. याचा मुलांवर खरोखरच चांगला परिणाम होऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतील.' याच पानावर हरियाणाचे राज्यपाल कॅप्तानसिंह सोलंकी आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल उर्मिलासिंह यांच्या फोटोंसह त्यांचे संदेश छापण्यात आले आहे.
माध्यमांना आत्मपरिक्षणाची गरज
नियतकालिकात भाजपशासित राज्यांतील अनेक उच्चपदस्थांचे फोटो आणि त्यांची आसाराम यांच्याबद्दलची श्रद्धा व्यक्त करणारी वक्तव्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या छायाचित्रासह त्यांचा कोट प्रकाशित करण्यात आला आहे. जेटली म्हणतात, 'मीडिया ट्रायलमुळे कोर्टात सुरु असलेल्या हायप्रोफाइल प्रकरणांवर दबाव येते. माध्यमे कोणालाही सरळ दोषी किंवा निर्दोष ठरवत चालले आहे. माध्यमांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कारण अशा समांतर ट्रायलमुळे वातावरण प्रभावित होते. माध्यमांनी न्यायालयिन प्रकरणांवर, दहशतवादी घटनांवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यासंबंधातील बातम्या प्रकाशित - प्रसारित करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. माध्यमाचे काम बातम्यांच्या माध्यमातून सामाजिक तणाव निर्माण करणयाचे नाही.'
कित्येक जामीन अर्ज फेटाळले गेले
महत्त्वाची बाब म्हणजे, आसाराम सप्टेंबर 2013 पासून बलात्कार प्रकरणी जोधपूर तुरुंगात कैद आहेत. त्यांचे अनेक जामीन अर्ज फेटाळले गेले आहेत. सुरतमध्येही त्यांच्यावर बलात्काराच आरोप झाला आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराचा या वर्षी जानेवारीमध्ये खून झाला आहे, हे विशेष. हा साक्षीदार आसाराम यांचा स्वंयपाकी होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय म्हणाले राजनाथसिंह, जेटली आणि सिंघल