आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Admiral Robin Dhowan As Next Navy Chief News In Marathi

व्हाईस अॅडमिरल रॉबिन धोवन नवे नौदल प्रमुख, तब्बल 2 महिन्यांनी झाली नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- व्हाईस अॅडमिरल रॉबिन धोवन यांची भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय नौदलातील वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन नौदल प्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद जवळपास दोन महिने रिक्त होते.
संरक्षण मंत्रालयाने रॉबिन धोवन यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे बुधवारी केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. डी. के. जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर रॉबिन धोवन प्रभारी नौदल प्रमुख म्हणून काम बघत होते.
नौदल प्रमुख या पदाच्या नियुक्तीसाठी पश्चिमेकडील नौदल कमांडर शेखर सिन्हा आणि पूर्वेकडूल नौदल कमांडर अनिल चोप्रा हेही या स्पर्धेत होते. यापैकी सिन्हा तिघांमध्ये वरिष्ठ होते. परंतु, त्यांच्या नावावर विचार झालेला दिसून येत नाही. दोन पाणबुडीच्या अपघातांसह 14 प्रमुख अपघात नौदलाच्या पश्चिम विभागात झाले असल्याने सिन्हा यांचे नाव मागे पडल्याचे सांगितले जात आहे.
रॉबिन धोवन यांचा नौदल प्रमुख या पदाचा कार्यकाळ एकूण 25 महिन्यांचा असेल.