आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंदे मातरम् वादावर बोलले उपराष्ट्रपती, म्हणाले आईला वंदन नाही करायचे तर काय अफजलला?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताचा विरोध करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले, वंदे मातरम् बाबत वाद होतो. त्याचा अर्थ होतो आईला वंदन. यात अडचण काय आहे. आईला वंदन करायचे नाही तर काय अफजल गुरूला करायचे का. व्यंकय्या नायडू विश्व हिंदु परिषदेचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात आले होते. दहशतवादी अफजल गुरू संसदेवरील हल्ल्याचा दोषी होता. त्यात त्याला फाशी झालेली आहे. 


हिंदुत्वात जीवन जगण्याचा मार्ग 
व्यंकय्या नायडू यांनी 1995 मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा उल्लेख करत म्हटले की, हिंदुत्व हा धर्म नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. हिंदुत्ववादी असणे म्हणजे संकुचित विचार नाही तर मोठ्या स्तरावर पसरलेल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणे आहे. 


वसुधैव कुटुम्बकम ही आमची संस्कृती 
- व्यंकय्या म्हणाले की, हिंदु धर्मात म्हटले गेले आहे की, हा धर्म म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे. यातील पाठपुजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण जीवन जगण्याचा मार्ग सारखाच आहे. 
- भारतीयांच्या अहिंसावादी भूमिकेमुळेच टॉम, डिक आणि हैरी (एका चित्रपटातील पात्रे) देशावर हल्ला करतात. राज्य करतात आणि लुटालूट करत आले आहेत. पण आपली संस्कृती अशी नाही. आपण कोणावर हल्ला चढवलेला नाही. आपली संस्कृती वसुधैव कुटुम्बकम अशी आहे. याचा अऱ्थ संपूर्ण जग म्हणजे एक कुंटुंब. 


सिंघल यांनी 75 वर्षे त्याग केला.. 
- उपराष्ट्रपती म्हणाले अशोक सिंघल हिंदुत्वाचे आग्रही होते. देशातील अनेक पिढ्यांसाठी त्यांनी 75 वर्षे त्याग केला. सायन्स आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊनही गंगेच्या किनाऱ्यावर जात समाज, धर्म आणि संस्कृतीचे प्रतिनिधीत्वही केले. 
- स्वातंत्र्याच्या लढाईत सिंघल यांची इच्छा होती की, मुस्लीमांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सुमारे 6 दशके समाजासाठी काम करणारे ते एकमेव प्रचारक होते. 

 

बातम्या आणखी आहेत...