आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vidarbh Sanyaukta Kriti Samiti Agitating In Delhi For The Separate Vidarbh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ संयुक्त कृती समितीचे दिल्लीत निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रातील यूपीए समन्वय समितीने आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्याच्या निर्मितीला मंजुरी दिल्यानंतर देशभर अन्य छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी मागण्यांनी जोर धरला आहे. यात महाराष्ट्रातून वेगळ्या विदर्भाची मागणीही पुढे आली आहे.

सोमवारी विदर्भ संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने केली. विदर्भाची मागणी तेलंगणाइतकीच जुनी असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तेलंगणाच्या विरोधात आंध्र प्रदेशात आंदोलन पेटले असताना वेगळ्या विदर्भासाठी तेथील जनताही रस्त्यावर उतरू लागली आहे.


गडकरी यांचा पाठिंबा
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दर्शवला आहे. छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजप अनुकूल असल्याचे नमूद करून तसे विधेयक मांडले गेले तर पक्षाचा विधेयकाला पाठिंबा राहील, असे त्यांनी म्हटले आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेणार असून विदर्भातील जनभावना लक्षात घेता तेलंगणाबरोबर विदर्भाचाही मुद्दा जोडला जावा, अशी मागणी ते करणार आहेत.