आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vidarbh Separate With Telengana, Mittemwar Demading In Loksabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणासोबतच विदर्भही स्वतंत्र राज्य करा, विलास मुत्तेमवार यांची लोकसभेत मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ नागपूर - विदर्भ राज्याची मागणी तब्बल 125 वर्षे जुनी आहे. तेलंगणासोबतच विदर्भही स्वतंत्र राज्य करा, अशी मागणी नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी मंगळवारी लोकसभेत केली.


लोकसभेत विदर्भाची मागणी उपस्थित करताना खासदार मुत्तेमवार म्हणाले, तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला जात असल्याने विदर्भाची मागणी पुढे आलेली नाही. ही मागणी सव्वाशे वर्षे जुनी असून केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्षाने वेळोवेळी स्थापन केलेल्या समित्या आणि आयोगांनी विदर्भ राज्याची शिफारस केली आहे. 1888 मध्ये तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने व्हॉइसरॉयकडे विदर्भ राज्याच्या निर्मितीची शिफारस केली होती. 1918च्या मद्रास तसेच 1928 च्या नागपुरातील काँग्रेस अधिवेशनात या मागणीला पूर्ण पाठिंबा देण्यात आला होता. 1938 मध्ये मध्य प्रांत आणि व-हाडच्या विधानसभेने विदर्भ राज्याच्या निर्मितीला पाठिंबा देणारा प्रस्ताव संमत केला होता. 1955 मध्ये न्या. फजल अली यांच्या नेतृत्वातील राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भ राज्याची शिफारस करताना विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरेल, असे मत व्यक्त केले होते.


प्रदेश भाजपचे नेते दिल्लीत
संसदेत तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा प्रस्ताव येणार असताना विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या प्रस्तावाचाही त्यात समावेश व्हावा, अशी मागणी करणारे निवेदन मंगळवारी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने भाजपच्या केंद्रीय नेत्यांना देण्यात आले. भाजपच्या नेत्यांनी विदर्भ राज्याची मागणी संसदेत लावून धरावी, अशी विनंतीही यावेळी केंद्रीय नेत्यांना करण्यात आली आहे.


विदर्भ राज्याची केस घेऊन भाजपचे प्रदेशाचे शिष्टमंडळ मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. या शिष्टमंडळाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली या तीन केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन त्यांना विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. संसदेत लवकरच तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा प्रस्ताव येणार आहे. या प्रस्तावात विदर्भ राज्याच्या निर्मितीचाही समावेश असावा. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आग्रही भूमिका घ्यावी, अशी विनंती प्रदेश शाखेने निवेदनात केली आहे.


सीमांध्र प्रदेशात सातव्या दिवशीही आंदोलन
अखंड आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी राज्यात मंगळवारीदेखील आंदोलन सुरूच होते. सलग सातव्या दिवशी रायलसीमा, किनारपट्टीवरील प्रदेशात निदर्शने झाली. निदर्शने, रास्ता रोको अशा विविध माध्यमांतून राज्यात अखंड समर्थकांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यात विद्यार्थी संघटनांचा अधिक सहभाग आहे. तेलंगणाव्यतिरिक्त असलेला भाग व रायलसीमा प्रदेशाला सीमांध्र म्हटले जाते.


सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांना रोखले
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर सीमांध्रमधील आक्रमक काँग्रेस खासदारांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत रोखले. काँग्रेस खासदार सब्बम हरी यांनी काही सदस्यांसह अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन वारंवार गोंधळ घातला. या वेळी एका क्षणी सोनिया यांनी हरी यांचा हात धरून रोखण्याचा प्रयत्न केला. सोनियांच्या पवित्र्यामुळे सीमांध्रातील खासदार शांत झाले.