आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Video Of Narendra Modi Playing Drum In Japan Visit Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 दिवसांत विकासदर वाढवला, 80 टक्के जनता समाधानी : सरकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो / नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये आपल्या सरकारची यशोगाथा गायली, तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील 80 टक्के जनता आमच्यावर खुश असल्याचे म्हटले आहे. बाजारही सरकारच्या सुरात सूर मिसळत आहे. मात्र शंभर दिवसांत फक्त प्रशासकीय दहशत पसरली, संस्थांची प्रतिष्ठा घालवली, केवळ भाजपचे अच्छे दिन आले आहेत, असा काँग्रेसचा दावा आहे.

मोदींचा दावा
जो विकासदर कधीकाळी ४.५-४.६ च्या आत लोंबकळत होता, तो आम्ही ५.७ टक्क्यांवर आणला आहे. धोरण लकव्यातून देश बाहेर पडला आहे. - जपानमधील वक्तव्य
काँग्रेसचे उत्तर
विकासदर एप्रिल-मे- जून महिन्यांतील आहे. या ९० दिवसांपैकी ५५ दिवस तर यूपीएचे सरकार होते. मोदींना येऊन केवळ ३५ दिवस झाले होते. मग हे यश त्यांचे कसे?
- आनंद शर्मा, काँग्रेस प्रवक्ता

मंगळवारी मोदी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले. जपानपासून भारतापर्यंत त्याचा उल्लेख झाला. जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या शंभर दिवसांचा हवाला देऊन उपलब्धी सांगितल्या. ते म्हणाले की, केवळ शंभर दिवसांत देशाची घडी नीट बसवली. आता सकारात्मक विचार होत आहे. तर ‘सरकारचे दावे फसवे आहेत. देशात कुठेच समाधान नाही. महागाई कमी झाली नाही की सुरक्षेची हमी नाही. देशाच्या सीमाही अशांत आहेत,’ असे काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
मोदी ओबामांची नक्कल करत आहेत- काँग्रेस
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते अमरेंद्रसिंह यांनी दोन उदाहरणे दिली-
१ - ज्याप्रमाणे ओबामांकडे सर्व शक्ती एकवटल्या आहेत, तसेच मोदीही करत आहेत. परराष्ट्र धोरणापासून ते गृह खात्यापर्यंत सर्व निर्णय मोदींच्याच इच्छेने होतात.
२ - ओबामांनी २००९ मध्ये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांपुढे भाषण दिले, आता मोदीही शिक्षक दिनी तसेच करणार आहेत.
अच्छे दिन भाजपला : लोकांचे जगणे कठीण झाले. दंगली वाढल्या आहेत. लोकांना नव्हे तर भाजपलाच अच्छे दिन आले आहेत. - काँग्रेस

...आणि अर्थव्यवस्था : १०० दिवसांत २३०२ अंकांनी सेन्सेक्स उसळला
पहिल्यांदाच गाठला २७ हजारांचा पल्ला , निफ्टीही ८ हजारांवर
सेन्सेक्स २७,००० आणि निफ्टी ८००० वर प्रथमच पोहोचला. मंगळवारी निर्देशांक १५१.८४ अंकाच्या वाढीसह २७,०१९.३९ वर आणि निफ्टी ५५.३५ अंकांच्या उसळीसह ८०८३.०५ वर बंद झाला. २६ मे रोजी मोदींच्या शपथविधीच्या दिवसापासून निर्देशांक २३०२.५१ अंक म्हणजेच ९.३१ टक्के, तर निफ्टी ७२४ अंक म्हणजेच ९.८३ टक्क्यांनी उसळला.

जगभरात मोदी सरकारचे कौतुक होत आहे. भ्रष्टाचार संपुष्टात आणणे आणि कर प्रणाली सुलभीकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. - असोचेम
छायाचित्र - जपान दौऱ्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी मोदींनी अनेक रंग दिसले. एका कार्यक्रमात त्यांनी ड्रम वाजवला तर दुसऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत ‘वंदे मातरम‌्..’ गुणगुणले. एका ठिकाणी मुलांसोबत सेल्फीही काढली.

पुढील स्लाइडमध्ये, मोदी म्हणाले, गीतेची भेट दिली
आता सेक्युलर खवळतील