आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉनचे फ्री रोमिंग इनकमिंग; मोबाइलधारकांना दिलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टेलिकॉम ऑपरेटर कंपनी व्हिडिओकॉन मोबाइल सर्व्हिसेसने त्यांच्या ग्राहकांसाठी रोमिंगमध्ये असताना इनकमिंग कॉल मोफत करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. एक राष्ट्र-फ्री रोमिंग या ब्रीदाला अनुसरून ग्राहकांसाठी व्हिडिओकॉन नेटवर्कमधील रोमिंगचे इनकमिंग कॉल मोफत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे सीईओ अरविंद बाली यांनी सांगितले.

यामुळे व्हिडिओकॉनचे नेटवर्क वापरणार्‍या ग्राहकांना रोमिंगमध्ये असताना आता इनकमिंग कॉलसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. व्हिडिओकॉन सध्या मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि गुजरातमध्ये चार सर्कलमध्ये कार्यान्वित आहे, तर सात सर्कलचा परवाना कंपनीकडे आहे. बिहार, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्कल कार्यान्वित करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी येणारा खर्च कंपनी स्वत: पेलणार असल्याचे बाली यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, रोमिंग फ्रीसाठी ग्राहकाला कोणतेही वेगळे व्हाऊचर किंवा रिचार्ज करण्याची गरज नाही.