आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षली हल्ल्यातील जखमी काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या महिन्यात छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विद्याचरण शुक्ल यांचे आज निधन झाले. शुक्ल यांच्यावर गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपाचर सुरु होते. मात्र, त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या. त्यामुळे 83 वर्षीय शुक्ल यांचे शरीर औषध उपचारांना साथ देते नव्हते. अखेर आज त्यांचे निधन झाले.

शुक्ला यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. याचबरोबर केंद्रात इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्रिपद राहिले. शुक्ला यांनी माहिती प्रसारण, गृह, संरक्षण, अर्थ, नियोजन, परराष्ट्र, संसदीय कार्यमंकत्री, जलसंधारण व नागरी सेवा आदी महत्त्वाची मंत्रिपदी केंद्रात काम पाहिले. इंदिरा गांधींशी त्यांचे निकटचे संबंध होते.


लोकसभेत तब्बल 9 वेळा ते निवडून गेले होते. सर्वप्रथम ते 1957 साली संसदेत पोहचले होते. त्यावेळी शुक्ल सर्वात तरुण खासदार ठरले होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी या तरुण व आकर्षक व्यक्तिमत्त्वाची तोंडभरुन कौतूक केले होते. विद्याचरण शुक्ल यांचे वडिल पंडित रविशंकर शुक्ल यांनीही मध्यप्रदेश प्रांताचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.