आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यासागर राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कल्याणसिंहांकडे राजस्थानची जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारने मंगळवारी चार राज्यांतील राज्यपालांची नियुक्ती केली. तेलंगणातील भाजपचे नेते सी. विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राव हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते.
के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यपालांची नियुक्ती करेल, असे संकेत होते. यूपीनंतर महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे राज्य असल्याने भाजपचे अनेक नेते राज्यपालपदी नियुक्ती व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. कल्याणसिंह यांनीसुद्धा महाराष्ट्र मिळावा म्हणून प्रयत्न केले होते.

राव यांची कारकीर्द
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय.
> करीमनगर येथून १२ व्या आणि १३ व्या लोकसभेवर निवड.
> आंध्र विधानसभेत भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते. तीन वेळा आमदार.
> विधानसभा निवडणूक काळात महत्त्वपूर्ण भूमिकेची चर्चा.