आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माल्यांच्या किंगफिशर व्हिलाला मिळाला नवा मालक, चौथ्या लिलावात 73 कोटींमध्ये झाली विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१२,३५० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला बंगला गोव्याच्या कंडोलीम  भागात आहे. - Divya Marathi
१२,३५० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला बंगला गोव्याच्या कंडोलीम भागात आहे.
मुंबई - सरकारी बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवून परदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या गोव्यातील ‘किंगफिशर व्हिला’ या बंगल्याचा अखेर ७३.०१  कोटी रुपयांत लिलाव झाला. यापूर्वी बँकांनी तीन वेळा लिलावाचे प्रयत्न केले हाेते. बँकांनी बंगल्याची किंमत ९० कोटी ठेवली होती. मात्र त्यापेक्षा कमी किंमत मिळाली. तेलगू अभिनेता सचिन जोशी यांनी हा बंगला विकत घेतला.
 
- मीडिया रिपोर्टनुसार, तीनवेळा किंगफिशर व्हिलाच्या लिलावाला अपयश आले होते. यावेळी विकिंग मीडिया अँड एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मीती कंपनीने एका प्रायव्हेट डीलने हा व्हिला खरेदी केला आहे. 
- माल्या यांच्याकडील थकित कर्जाची थोडी तरी वसुली करण्यात बँकांना यामुळे यश मिळाल्याचे मानले जात आहे. 
- माल्या यांनी त्यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी तारण ठेवलेल्या मालमत्तांपैकी गोव्यातील हा व्हिला एक होता. 

माल्यांच्या डोक्यावर 9 हजार कोटींचे कर्ज 
- 17 बँकांना विजय माल्यांकडून 9 हजार कोटी रुपये वसूल करायचे आहेत. 
- या बँकांच्या समुहाचे नेतृत्व एसबीआय करत आहे. एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोवा येथील व्हिलाच्या लिलावावर अद्याप अधिकृत निवदेन केलेले नाही. किंवा विकिंग मीडियाचे मालक आणि अभिनेता सचिन जे. जोशीने त्यावर भाष्य केले आहे. 
- बँक मुंबईतील किंगफिशर हाऊसचाही लिलाव करत आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, वाचा कोण आहे सचिन जोशी 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...