आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Bahuguna Resingation Confirmed, Rawat May New Chief Minister Of Uttarakhand

विजय बहुगुणा यांचा राजीनामा निश्चित,हरीश रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पद जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बहुगुणा यांच्याकडे राजीनामा मागितला आहे. बहुगुणा शुक्रवारी पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.


उत्तराखंडच्या आगामी मुख्यमंत्र्यांच्या नावावर सोनिया गांधी यांनी गुरुवारी चर्चा केली. गुलाम नबी आझाद , जनार्दन द्विवेदी आणि पक्षाच्या राज्य प्रभारी अंबिका सोनी यांना उत्तराखंडला पाठवण्यात येणार आहे. तिन्ही नेते सत्ता परिवर्तनाची रचना तयार करणार आहेत. दोन फेब्रुवारीला नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. विजय बहुगुणा यांना हटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडवर दबाव होता. नैसर्गिक आपत्तीनंतर बहुगुणा यांच्या विरुद्ध असंतोषाची भावना निर्माण झाली होती. नेतृत्वात बदल झाला नाही तर पक्षात फूट पडेल, असा इशारा राज्यातील नेत्यांनी दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते, असे चित्र होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तराखंडच्या सर्व पाच विधानसभा जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. त्या विजयी उमेदवारांत बहुगुणा यांचाही समावेश होता.


रावत जुनेच दावेदार
मुख्यमंत्री पदाचे हरीश रावत जुनेच दावेदार आहेत. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर रावत या पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. परंतु हायकमांडने बहुगुणा यांची निवड केली. म्हणूनच रावत यांची दावेदारी या वेळी प्रबळ आहे. दुसरीकडे इंदिरा हृदयेशदेखील दावा करू शकतात. 1974 पासून संसदीय राजकारणात आहे. स्वत: ला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य समजते, अशी प्रतिक्रिया इंदिरा यांनी दिली आहे. राज्याच्या 70 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे 33 आमदार आहेत. बसपा आणि अपक्ष प्रत्येकी तीन आहेत. उत्तराखंड क्रांती दलाच्या एका आमदाराचे समर्थनही आहे. उर्वरित 30 सदस्य भाजपचे आहेत.