आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा खाण वाटप घोटाळा - विजय दर्डांसह माजी कोळसा सचिवांवर आरोप निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. छत्तीसगडमध्ये कोळसा खाण वाटपात घोळ केल्याचा आरोप लावण्यात आला.

न्यायालयाने दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी आणि त्याचे संचालक मनोजकुमार जायसवाल यांच्यासह विजय दर्डांचे पुत्र देवेंद्र दर्डांवरही आरोप निश्चित केले आहेत. सीबीआय न्यायाधीश भरत पराशर यांच्या न्यायालयात सर्वांवर भ्रष्टाचार, अपहार, गुन्हेगारी कारस्थानाचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पुरावे १६ डिसेंबर रोजी सादर केले जातील. २० नोव्हेंबर २०१४ रोजी न्यायालयाने सीबीआयचा अहवाल फेटाळला होता व पुन्हा तपासाचे आदेश दिले. सीबीआयने सुरुवातीच्या अहवालात म्हटले होते की, जेएलडी यवतमाळने फतेहपूर पूर्व कोळसा खाण मिळवण्यासाठी पूर्वी मंजूर झालेल्या ४ कोळसा खाणींची माहिती बेकायदेशीररीत्या लपवली होती. मात्र सीबीआयने नंतर हा तपास अहवाल सील केला.
बातम्या आणखी आहेत...