आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद थांबल्याशिवाय भारत-पाकिस्तान क्रिकेट सिरीज नाहीच; क्रीडा मंत्र्यांची स्पष्टोक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून होणारा सीमापार दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सिरीज शक्यच नाही. बीसीसीआयने सुद्धा अशा प्रकारचा कोणताही विचार करण्यापूर्वी सरकारला कळवणे आवश्यक आहे असे क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, 2007 पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकही दुहेरी क्रिकेट मालिका झालेली नाही. 
 
बीसीसीआयच्या भूमिकेवर नाराज
केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी ही स्पष्टोक्ती बीसीसीआय आणि पीसीबीच्या बैठकीपूर्वी केली आहे. बीसीसीआयचे अमिताभ चौधरी यांनी भारत-पाक दुहेरी क्रिकेट मालिका आयोजित करण्याबाबतची शक्यता वर्तवली होती. त्यावर गोयल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बीसीसीआय अशा प्रकारची सिरीज आयोजित करण्याचा विचार करत असेल तर त्यापूर्वी सरकारला कळवावे. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्रित चालणार नाही असेही गोयल यांनी ठणकावले आहे. 
बातम्या आणखी आहेत...