आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय मल्ल्याचे प्रकरण आमच्यासमोर कसे आले? सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या पीठाने विचारला प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पलायन केलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुरू असलेली सुनावणी सोमवारी होऊ शकली नाही. कारण न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. फली एस. नरीमन यांच्या पीठासमोर याचिकेवर सुनावणी सुरू असताना बँकांनी ही याचिका  न्या. ए.के. गोयल आणि न्या. यू.यू. ललित यांच्या पीठासमोर का आणली याची माहिती घेतली जाणार आहे. मल्ल्याने ४ कोटी डॉलर मुलांच्या खात्यात जमा केल्याने एसबीआयच्या नेतृत्वात १७ बँकांच्या समूहाने मल्ल्यावर न्यायालयाची अवमानना झाल्याचा आरोप केला आहे. 
 
न्या. गाेयल आणि न्या. ललित यांच्या पीठाने साेमवारी म्हटले की, न्यायालयात सुनावणीसाठी लिस्टिंगची व्यवस्था आहे. त्यामुळे कुठलेही प्रकरण न्यायालयात सादर करता येत नाही. हे प्रकरण आमच्या पीठासमोर कसे काय सादर करण्यात आले, याची माहिती घ्यावी लागणार आहे. ३ मार्चला प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
 
दरम्यान, विविध न्यायालयांच्या आदेशांची अवमानना करून मुलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या प्रकरणात न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. नरिमन यांच्या पीठाने माल्याला उत्तर मागितले होते. मल्ल्याने डेट रिकव्हरी ट्रिब्यूनल आणि कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची अवमानना करून पैसे मुलांच्या नावावर जमा केल्याचा आरोप बँकांच्या समूहाने केला आहे. बँकांच्या मते, मल्ल्या आणि त्याच्या कंपनीवर कर्जाचे ६,२०० कोटी रुपयांचे ओझे आहे. मल्ल्याच्या स्विस बँकेतील खात्यात रक्कम जमा असल्याचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी म्हटले होते. ही रक्कम परत आणायला हवी, असेही त्यांनी सांगितले होते.

मागील वर्षीही फटकारले
विदेशातील सध्याच्या संपत्तीचा खुलासा न केल्याने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने मल्ल्याला फटकारले होते. एक महिन्यात याचा खुलासा करण्यास सांगितले होते. तसेच मागील वर्षी २५ फेब्रुवारीला ब्रिटिश फर्म डियाजियोकडून मिळालेल्या ४ कोटी डॉलरची माहिती देण्यासही सांगितले होते. बँकांनी मागील वर्षी आरोप लावला होता की, मल्ल्याने ४ कोटी डॉलरच्या रकमेसह इतर संपत्तीचा खुलासा केलेला नाही. 
बातम्या आणखी आहेत...