आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकन करी - केन फिश आहे माल्ल्याचा विकपॉइंट, भारतासह या देशात आहे प्रॉपर्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आलिशान महाल गोव्यातील आहे. त्याचे नाव किंगफिशर व्हिला आहे. खास गोव्याच्या शैलीत त्याला डिझाइन केलेले आहे. - Divya Marathi
हा आलिशान महाल गोव्यातील आहे. त्याचे नाव किंगफिशर व्हिला आहे. खास गोव्याच्या शैलीत त्याला डिझाइन केलेले आहे.
नवी दिल्ली - भारतातील बँकांना चुना लावून ब्रिटनमध्ये पळालेला मद्यसम्राट माल्ल्या याला कायद्याच्या फेऱ्यांमध्ये अडकवण्यात भारत सरकारला यश आले. माल्ल्याची अटक ही दिवाळी साजरी करण्यासारखी घटना नव्हे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. तो रास्त असला तरी माल्ल्याभोवती फास टाकता आला ही घटनाही महत्त्वाची ठरते. 
 
माल्ल्याला मंगळवारी लंडनमध्ये अटक आणि जामीनावर सुटकाही झाली आहे. काहीच वर्षांपूर्वी भारतातील उद्योग जगतापासून क्रिकेट आणि राजकारणातही सक्रिय असलेला विजय माल्ल्या आता लंडनमध्ये पळून गेला आहे.  त्याच्या बद्दलच्या इंट्रेस्टिंग फॅक्ट्स DivyaMarathi.com घेऊन आले आहे. 
 
माल्ल्याला आवडते चिकन करी आणि केन फिश 
- माल्ल्या याचे सर्वात जुने आणि आलिशान घर कॅलिफोर्नियामध्ये आहे. 1987 मध्ये त्याने हे खरेदी केले होते. 11 हजार वर्गफूट एवढे या व्हिलाचे क्षेत्रफळ आहे.
- साऊथ अफ्रिकेतील जोहन्सबर्ग येथे माल्ल्याचा मबालू गेम लॉज आहे. 12 हजार हेक्टर परिसरातील या गेम लॉजमध्ये अनेक पक्षी आणि जनावरे पाळलेल आहेत.
- माल्ल्याच्या विलासी आयुष्याची झलक फ्रान्समधील रिव्हेरा येथील आयलँड लर्निस येथे पाहायला मिळते. Sainte-Marguerite आयलँडवरही त्याची प्रॉपर्टी आहे. ज्याची किंमत अंदाजी 350 कोटी रुपये आहे. याचे 'द ग्रँड गार्डन' हे नाव आहे.
- माल्ल्याचे अश्वप्रेम सर्वश्रूत आहे. घोड्यांसाठी त्यानी कर्नाटकातील टुमकुर येथे हॉर्सफार्म खरेदी केले होते. 400 एकरात पसरलेल्या हॉर्सफार्ममध्ये तो हॉर्स रायडिंगचाही मनमुराद आनंद घेतो. घोड्यांसाठी येथे मेडिकल केअर सेंटर आणि वॉटर प्युरीफिकेशन प्लँट देखील आहे.
- जगभरात त्याची भारतासह स्कॉटलँड, मोनाको, न्यूयॉर्क, साऊथ अफ्रिका येथे प्रॉपर्टीज आहे.
- पार्टी लव्हर म्हणून माल्ल्या ओळखला जातो. त्याच्या हायप्रोफाइल आयुष्याची अनेक दिग्गजांसह माध्यमांमध्ये चर्चा असते.
- त्याच्या आवडीचे हॉलिडे डेस्टीनेशन फ्रान्सजवळील सेंट बार्टस आयलँड आहे. भारतात सुटीचा सर्वाधिक काळ गोव्यात घालवयचा.
- माल्ल्या Audemars Piguet ब्रँडच्या घड्याळ वापरतो.
- ज्वेलरीमध्ये त्याला हिर्‍यांचे दागिणे वापरणे अधिक पसंत आहे. त्याचे ब्रेसलेट, अंगठी आणि कानातील बाळीमध्येही हिरे आहेत.
- कोस्टल फुडचा चाहता असलेल्या माल्ल्याला चिकन करी आणि केन फिश सर्वाधिक आवडते. याशिवाय मसाला डोसा त्याचा विकपॉइंट आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जगभरात कुठे - कुठे आहे माल्ल्याची प्रॉपर्टी 
बातम्या आणखी आहेत...