नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना अवमाननेप्रकरणी दोषी ठरवले. कोर्टाच्या आदेशानंतरही मल्ल्यांनी संपूर्ण मालमत्तेचे विवरण दिले नसल्याचे कोर्टाने मान्य केले. ९ एप्रिलला सर्वाेच्च न्यायालयाने मल्ल्यांविरुद्ध अवमानना आणि डियाजियो डीलमधून मिळालेल्या ४ कोटी डॉलर्सच्या प्रकरणावर निकाल राखून ठेवला होता. कोर्टाने मल्ल्यांना १० जुलै रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्याच दिवशी शिक्षेवरही सुनावणी केली जाईल. बँकांनी गेल्या वर्षी २९ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, मल्ल्यांनी जाणूनबुजून आपल्या संपूर्ण मालमत्तेचे विवरण दिले नाही.