आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय मल्ल्यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँकांचे ९,४०० कोटी बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांनी सोमवारी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राज्यसभा शिष्टाचार समिती त्यांच्या निलंबनाची शिफारस मंगळवारी ज्येष्ठ सभागृहाला पाठवणार होती.

राज्यसभा सभापती हामिद अन्सारी यांना पाठवलेल्या पत्रात मल्ल्यांनी म्हटले की, ‘आपले नाव व प्रतिष्ठा आणखी मलीन व्हावी , अशी अापली इच्छा नाही. गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमावरून दिसते की, आपल्याला येथे नि:पक्ष सुनावणी वा न्याय मिळणार नाही. यामुळे आपण तत्काळ प्रभावाने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.’ शिष्टाचार समितीच्या २५ एप्रिलच्या बैठकीत मल्ल्यांच्या निलंबनाबाबत निर्णय झाला होता.
बातम्या आणखी आहेत...