आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Mallya Skips ED For Third Time, Seeks Time Till May

मल्ल्यांची पुन्हा हुलकावणी, ईडीसमाेर हजर राहण्यासाठी मागितला मेपर्यंत वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी ९०० कोटी रुपयांच्या आयडीबीआय कर्ज फसवणूक प्रकरणात शनिवारी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) पुन्हा हुलकावणी दिली. या प्रकरणी ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये मल्ल्यांची चौकशी सुरू आहे.
वैयक्तिक कारणांमुळे आजच्या तारखेला (९ एप्रिल) तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहून आपण जबाब नोंदवू शकत नाही, असे मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्यांना कळवल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. मल्ल्यांनी थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा आधार घेतला आहे. मल्ल्यांना मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर शनिवारीच हजर व्हायचे होते. देशातील १७ सार्वजनिक बँकांचे ९००० कोटींचे कर्ज थकवून मल्ल्या लंडनला पळून गेले आहेत. यापूर्वी मल्ल्यांना १८ मार्च आणि एप्रिल रोजी ईडीसमोर हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते.