आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनियुक्त राष्‍ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्विकारला पदभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या नवनियुक्त राष्‍ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज दुपारी 4 वाजता भाजपच्या मुख्यालयात त्यांच्या पदाची सुत्रे स्विकारले. रहाटकर यांनी औरंगाबाद मनपाच्‍या महापौर म्‍हणून काम पाहिले आहे. तर अखिल भारतीय भाजपच्या महिला मोर्चाच्या दोनवेळा महामंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला धोरणाचे जे स्वप्न पाहिले आहे ते राबविण्यासाठी महिला मोर्चा कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रहाटकर यांनी या प्रसंगी दिली. महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करणे, महिला सुरक्षा, महिला आरक्षण आणि महिलांना शिक्षण याबाबींवर प्राथमिकतेने कार्य करण्यासाठी भाजप महिला मोर्चा पुढाकार घेणार आहे. त्यांनी पदभार स्विकारला तेव्हा पक्षाचे महासचिव जे.पी.नड्डा, रामलाल, मृदुला सिन्हा, राष्‍ट्रीय संघटन महामंत्री लतिका शर्मा, रश्मिधर सूद, रेखा गुप्ता, कनक अग्रवाल, योगिता सिंह, सुधा शर्मा आदी पदाधिकारी आणि असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.