आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaynagar Come Its Past Position, Curfew Relaxed

आंध्र प्रदेश विभाजनाच्या मुद्द्यावरून होरपळलेले विजयनगर पूर्वपदावर,संचारबंदीही शिथिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयनगर - आंध्र प्रदेश विभाजनाच्या मुद्द्यावरून होरपळलेल्या विजयनगरमध्ये सोमवारी दिवसभरासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


शहरातील स्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक पी. उमापथी यांनी दिली. विजयनगरमध्ये गेल्या सहा-सात दिवसांत कुठेही हिंसक घटना घडली नाही. शहरात मात्र जमावबंदी आदेश कायम आहे.


सीमांध्रातील वकील दिल्लीत निदर्शने करणार
अखंड आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी सीमांध्र प्रदेशाच्या 13 जिल्ह्यांतील वकील राजधानी दिल्लीत शुक्रवारी निदर्शने करणार आहेत. जंतरमंतरवरील निदर्शनांत एक हजार वकील सामील होतील, अशी माहिती सीमांध्र वकील कृती समितीचे संयोजक मुप्पल्ला सुभा राव यांनी दिली. संयुक्त आंध्र प्रदेशच्या बाजूने शब्द दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राव म्हणाले. सीमांध्रातील 35 हजार वकिलांनी तेलंगणविरोधातील विविध निदर्शनांत भाग घेतला आहे.