आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबळ्या महासत्तेची दुखरी बाजू: खेड्यातील गरिबांची दररोज अवघ्या 17 रुपयांत गुजराण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खेड्यातील सर्वांत गरीब लोक दररोज सरासरी 17 रुपयांतच गुजराण करतात. शहरातील लोक मात्र दिवसाकाठी 23 रुपये खर्च करतात. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने (एनएसएसओ) गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली.


नव्या आकड्यांनुसार सर्वात कमी खर्च करणा-या पाच टक्के लोकसंख्येचा दरडोई मासिक खर्च खेड्यांत 521.44, तर शहरांत 700.50 रुपये एवढा आहे. सर्वाधिक खर्च करणा-या पाच टक्के लोकसंख्येचा दरडोई मासिक खर्च खेड्यांत 4,481 रुपये, तर शहरांत 10,282 रुपये एवढा आहे. एनएसएसओने जुलै 2011 ते जून 2012 या काळात 7,496 गावे आणि 5,263 शहरी भागात सर्वेक्षण केले. राष्‍ट्रीय पातळीवर सरासरी माणसी मासिक खर्च खेड्यांत 1,430 आणि शहरी भागात 2,630 रुपये एवढा आहे. एका खेडुताच्या तुलनेत शहरी व्यक्ती सरासरी 84 टक्के जादा खर्च करतो. अन्नधान्य, खाद्यपदार्थ, पेये, इंधन, कपडे, मनोरंजन, वैद्यकीय गरजा, शिक्षण आदींवर होणा-या खर्चाचा यात तपशील आहे.