आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinay Sahsrabuddhe Very Soon Become Rajya Sabha Memuber

विनय सहस्रबुद्धे यांची लवकरच राज्यसभेवर वर्णी लागण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची लवकरच राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर किंवा महाराष्ट्रातून ते राज्यसभेत जाऊ शकतात, अशी माहिती भाजपच्या
सूत्रांनी दिली, परंतु त्यांच्या संभाव्य मंत्रिपदात अडथळे आणण्यासाठी भाजपचेच काही
खासदार सरसावले आहेत.

नितीन गडकरी यांचे राजकीय सल्लागार राहिलेले सहस्त्रबुद्धे अखिल भारतीय विद्यार्थी
परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करून त्यानंतर भाजपमध्ये आलेले सहस्त्रबुद्धे यांचा अभ्यासू नेते म्हणून नावलौकिक आहे. सहस्त्रबुद्धे यांच्यासाठी अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली असून प्रजासत्ताक दिनानंतर जम्मू-काश्मीर, महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी २० फेब्रुवारीच्या आत केंद्रीय मंत्रिमंडळाचा वि स्तार होण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातून भाजपसह शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, परंतु सहस्त्रबुद्धे यांना मंत्री करण्याबाबत भाजपमधीलच काही नेते नाराज असून त्यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी फिल्डींग लावली जात आहे.या शिवाय राज्यसभेवर निवड झालेल्यांनाच मंत्रिपद दिले जात असल्यानेही लोकसभेतील अन्य सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.