आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाेबांच्या अनुयायांचे वर्षभरापासून धरणे, गाेवंश हत्या बंदी कायदा देशभर लागू करण्‍याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रात गाेवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात अाला. मात्र, हा कायदा देशभर लागू व्हावा यासाठी अाचार्य विनाेबा भावे यांचे अनुयायी वर्षभरापासून जंतरमंतरवर तळ ठाेकून अाहेत. पण त्यांच्याकडे अद्याप काेणीही फिरकले नाही. जाेपर्यंत हा कायदा लागू हाेत नाही ताेपर्यंत येथून हटणार नाही असा निर्धार वयाची ८० पार केलेल्या गाेभक्तांचा अाहे. 

गाेवंश हत्याबंदी व मांस निर्यातबंदी व्हावी म्हणून ११ जानेवारी १९८२ पासून विनाेबांच्या सूचनेनुसार मुंबईतील  देवनार कत्तलखान्यासमाेर अांदाेलन सुरू करण्यात अाले हाेते. याच वर्षी १५ नाेव्हेंबर राेजी विनाेबांचा मृत्यू झाला. मात्र, अच्युतभाई देशपांडे यांच्या नेतृत्वात हे अांदाेलन सुरू हाेते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अाल्यानंतर १० एप्रिल २०१५ राेजी हा कायदा लागू करण्यात अाला. तब्बल ३३ वर्षे ५१ दिवस चाललेले हे अांदाेलन मुंबईपुरते थांबविण्यात अाले. 

महाराष्ट्रात तर झाला, परंतु देशभरात हा कायदा लागू व्हावा म्हणून ३१ जानेवारी २०१६ पासून  दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा धरणे अांदाेलन सुरु करण्यात अाले. यात सहभागी हाेणारे सगळेच वयाेवृद्ध अाहेत. त्यात गाेरक्षा सत्याग्रह संचालन समिती सेवाग्रामचे अण्णा जाधव, सतीश नारायण, सेवाग्राम अाश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष अॅड. मा.म.गडकरी, नयी तालीम समितीचे अध्यक्ष डाॅ. सुगन बरंठ, अमरनाथ भाई, डाॅ. रामजी सिंग यांचा समावेश आहे, परंतु गेले वर्षभर अण्णा जाधव व सतीश नारायण हे जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. त्यांच्या मते सरकार काेणाचेही असाे, उद्याेजकांचे दडपण सरकारवर अाहे. त्यामुळे  गाेवंश हत्याबंदीचा कायदा केंद्रात लागू करणे सरकारला अवघड जात अाहे. कायदा लागू हाेईपर्यंत उठणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.
 
दिल्लीतील या अांदाेलनाला एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला परंतु काेणताही नेता, मंत्री, अधिकारी फिरकला नाही. नारायण म्हणाले, आम्ही समाेरच्या गुरुद्वारामध्ये जेवायला जाताे. काेणी या सत्याग्रहाला भेट द्यायला अाले तर थाेडीफार मदत ते करतात. त्यात अन्य खर्च निघून जातात.  
 
थंडीपासून बचाव म्हणून एकाने ब्लँकेट दिले तर डासांपासून वाचण्यासाठी काेणी मच्छरदाणी दिली.  प्रार्थना ही येथील नित्याची बाब झाली अाहे. काेणीतरी येथे येऊन चरख्यावर सूत कताई करायला लागले अाहेत. महाराष्ट्रात हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम आणि दलित नेत्यांनी विराेध केला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...