आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तासांतच बिन्नींचे उपोषण मागे, केजरीवालांना दिली 10 दिवसांची मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीतून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले आमदार विनोदकमार बिन्नी यांनी केजरीवालांविरुद्ध उपसलेले उपोषणास्त्र तीन तासांतच म्यान केले आहे. आज (सोमवार) सकाळी बिन्नी यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, तीन तासांतच त्यांनी उपोषण आणि धरणे आंदोलन मागे घेतले आहे. त्याच बरोबर त्यांनी परदेशी महिलांच्या छेडछाडीचा आरोप असलेल्या सोमनाथ भारती यांच्या राजीनाम्याची मागणी केजरीवाल यांच्याकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना 10 दिवसांची मुदत दिली आहे.
दुसरीकडे संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) तिकीटावर विजयी झालेले आमदार शोएब इक्बाल यांनी, केजरीवालांना सरकार चालवायचे आहे की नाही, असा सवाल विचारला आहे. इक्बाल यांनी जेडीयूचा राजीनामा दिला असून ते आपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत.
आमदार बिन्नी यांना पक्षातून काढल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. ते लिहितात, 'बिन्नींना पक्षातून काढण्याचे दुःख होत आहे. मात्र त्यांनी दुसरा कोणताच मार्ग शिल्लक ठेवला नव्हता.'
बिन्नी यांनी 16 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना हुकुमशाह म्हणत त्यांच्या 'कथनी आणि करणीत' अंतर असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, आप सरकार त्याच्या उद्देशांपासून दूर जात आहे. निवडणुकीआधी जनतेला दिलेली आश्वसने पूर्ण केली जात नाही.

पुढील स्लाइडमध्ये, बिन्नी यांचे आरोप आणि आपचे प्रत्युत्तर