आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Kumar Binny Took Support Back From Aap Latest News

आमदार बिन्नींनी समर्थन मागे घेतले, केजरीवाल सरकार आता शोएब इक्बाल यांच्या पाठिंब्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आज केजरीवाल सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यांनी समर्थन मागे घेत असल्याचे पत्र उपराज्यपाल नजीब जंग यांना लिहिले आहे. बिन्नी हे लक्ष्मीनगर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
बिन्नी यांनी समर्थन मागे घेतल्याने केजरीवाल सरकारला सध्यातरी धोका नाही. आपने विधानसभेच्या 28 जागांवर विजय मिळविला आणि काँग्रेसच्या आठ सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यानंतर जनता दल संयुक्तचे दिल्लीतील एकमेव आमदार शोएब इक्बाल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि आपला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच अपक्ष आमदार रामवीर शौकिन यांनीही केजरीवाल सरकारला समर्थन दिले आहे. त्यामुळे बिन्नी यांनी समर्थन मागे घेतले असले तरी, सरकारच्या बाजूने 37 सदस्य आहेत. दिल्ली विधानसभेत एकूण 70 सदस्यसंख्या असून बहुमतासाठी 36 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवाल सरकारच्या अडचणी वाढणार