आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्येयवेडा : ‘नच बलिये’च्या विनोदने जिंकले जग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जन्मत:च दोन्ही पाय नव्हते, म्हणून मोठेपणी जिम लावून हातांचे बळ वाढवले. मित्रांच्या आग्रहाखातर डान्स करायला सुरुवात केली. तासन्तास आरशासमोर उभे राहून स्वत:शीच संघर्ष केला. तीन वर्षांपूर्वी इंडियाज गॉट टॅलेंटच्या उपांत्य फेरीत पोहचले. या यशातून मिळालेल्या पैशातून त्याने डान्स अकॅडमी सुरू केली. पत्नी रक्षासोबत मागील आठवड्यात नच बलियेच्या टॉप तीन जोड्यांमध्ये सहभागी होऊन पुन्हा प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली.
दिल्लीतील द्वारका परिसरात राहणा-या विनोदच्या आयुष्यात हे फक्त एक यशशिखर नसून ते एक मोठे पर्व आहे. बहुतांश लोकांचा हाच प्रश्न असतो की, एवढी चांगली सक्षम पत्नी तुमच्या आयुष्यात कशी आली? रक्षा उत्तर देते, ‘मी मैत्रिणींसोबत डान्स शिकण्यासाठी विनोदजींच्या अकॅडमीत आले होते. त्यांचा मनमिळाऊ, हसतमुख स्वभाव आणि स्वावलंबी बनण्याची जिद्द पाहून मी खूप प्रभावित झाले आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचे कुटुंबीय या लग्नाविरोधात होते.’
अपंग मुलांना मोफत प्रशिक्षण
विनोदच्या स्टुडिओत आज 50 विद्यार्थी डान्स शिकण्यासाठी येतात. त्यापैकी अर्धी मुले गरीब तर 12-13 मुले अपंग आहेत. अशा मुलांकडून तो शुल्क घेत नाही. त्याने ‘द इंडियन डिसेबल्ड टॅलेंट हंट ट्रस्ट’ सुरू केली आहे. उत्पन्नाचा 20 टक्के भाग तो अपंग मुलांवर खर्च करतो. विनोद म्हणतो, ‘मला कुणाचे उपकार नको. त्यांचा विकास करा, अशीच प्रेरणा देतो. त्यांना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी माझी मदत मिळावी, हीच माझी इच्छा आहे.’