आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी, हरियाणाचा विपुल गर्ग टॉपर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीएसईने मंगळवारी अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणीचे (एआयपीएमटी) निकाल विक्रमी २३ दिवसांत जाहीर केले. हरियाणाच्या जिंदमधील
सर्वसामान्य कुटुंबातील विपुल गर्ग हा पहिला, तर राजस्थानची खुशी तिवारी दुसरी आली आहे.
सामान्य श्रेणीतील कट अॉफ ६३%, अनुसूचित जाती व जमातींसाठी तो अनुक्रमे ४५% आणि ४०% आहे. स्टेट पीएमटी व एम्ससारख्या संस्थांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यामुळे आताचे प्रवेश वेटिंग लिस्टमधून होतील. परिणामी अखिल भारतीय कोट्यातून अॅडमिशनचा कट ऑफ आणखीही कमी होऊ शकतो.माेठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ३ मे रोजी आयोजित परीक्षा रद्द केली होती. सीबीएसईने २३ जुलैला नव्याने परीक्षा घेतली. ५० शहरांत १,०६५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत ६.३२ लाख पैकी ३.७४ लाख परीक्षार्थींनीच परीक्षा दिली. हायटेक कॉपी रोखण्यासाठी ड्रेसकोड निश्चित करण्यात आला. यामुळे मोठ्या प्रमाणात परीथार्थी परीक्षा देऊ शकले नव्हते.एआयपीएमटी-२०१५ मधून १५% ऑल इंडिया कोट्यांतर्गत ३,७२२ जागा भरल्या जातील.
आई-वडिलांची स्वप्नपूर्ती : विपुल
निकालामुळे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ३ मे रोजी रद्द झालेल्या परीक्षेनंतर मिळालेला वेळ मी माझे कच्चे दुवे दूर करण्यात वापरला. आईवडिलांनी माझ्या शिक्षणाचे पैसे जमवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मला कार्डिअोलॉजिस्ट बनायचे आहे.
- विपुल गर्ग, एआयपीएमटी टॉपर