आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम २१ दिवसांत लंकेहून अयोध्येत पोहोचले होते, गुगल मॅपनेही दाखवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियावर भगवान राम यांच्याशी संबंधित एक संदेश सध्या फिरतोय आणि तो खूप चर्चेत आहे. फेसबुकवर शेअर होत असलेल्या या पोस्टमध्ये दाखविले आहे की, दसऱ्यानंतर २१ दिवसांनंतरच दिवाळी यासाठी साजरी केली जाते, कारण दसऱ्यानंतर रावणाचा वध केल्यावर भगवान राम पायीच अयोध्येला परतले होते. श्रीलंकेहून अयोध्येला पोहोचण्यासाठी भगवान राम यांना २१ दिवस लागले होते.
या पोस्टमध्ये गुगल मॅपचा एक फोटोदेखील शेअर केला जात आहे आणि दावा केला जात आहे की, श्रीलंकेहून अयोध्येचे अंतर २५८६ किलोमीटर आहे. या अंतरास पायी कापले तर त्यासही २१ दिवस (५१४ तास) लागतील. म्हणजे दररोज १२३ किलोमीटर चालावे लागेल. म्हणजे प्रतितास ५ किलोमीटर चालावे लागेल, तेदेखील न थांबता. हा संदेश फेसबुकच्या शिवाय व्हॉट्सअॅप वरही खूप शेअर होत आहे. ट्विटरवरही रामअयोध्यारोडट्रिप या नावाने हॅशटॅग सुरू आहे. या हॅशटॅगला घेऊन अनेक लोक ट्विट करत आहेत. अनेक लोक या पोस्टचे समर्थन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूने काही लोकांनी प्रश्नदेखील उभे केले आहेत की, भगवान राम पायी नव्हे, पुष्पक विमानाने लंकेहून अयोध्येला परतले होते.

क्वेरावर २०१५ पासून सुरू आहे चर्चा, ४१ हजारांवर लोकांनी पाहिले पेज प्रश्नोत्तरांची वेबसाइट क्वेरावरही या प्रकरणास घेऊन एक मोठी चर्चा छेडली गेली आहे. २०१५ मध्ये क्वेरावर प्रश्न विचारले गेले की, दसऱ्यानंतर भगवान राम किती दिवसांनी अयोध्येला पोहोचले होते. यावर अनेक लोकांनी आपले मत दिले आहे. कुणी छायाचित्रे तर कुणी ग्राफिक्सच्या द्वारे आपले उत्तर दिले आहे. अनेक लोकांनी आपल्या तर्कासह दुसऱ्या वेबसाइट्सवरील लिंकदेखील शेअर केल्या आहेत.

{श्रीलंकेमधून - गुगलवर हा मार्ग श्रीलंकेच्या डमबुल्लातील चांदनापासून सुरू होतो. इथून किंबिसा, गलकुलामा, मिहिंटाले, मेडवाछियावरून तलाईमन्नारपर्यंत पोहोचत आहे. यानंतर तिथून सागरीमार्गे रामेश्वरमला पोहोचतो आहे.
{भारतातून - रामेश्वरपासून कुंभकोणम, तिरुपती, नेल्लोर, ओंगले, सूर्यापेटला पोहोचतो. महाराष्ट्रातील नागपूर, मध्य प्रदेशच्या सिवनी, जबलपूर, कटनी, रेवा. नंतर मग यूपीतील अलाहाबाद, सुल्तानपूर, रेहटवरून अयोध्या.
'क्योरा'वर 2015 पासून सुरु आहे चर्चा, आतापर्यंत 41000 लोकांनी पाहिले आहे पेज...
- प्रश्न-उत्तराची वेबसाइट 'क्योरा'वर देखील या मुद्द्यावर 2015 पासून चर्चा सुरु आहे. 'दसर्‍यानंतर श्रीराम किती दिवसांत अयोध्यात परतले होते? हा प्रश्न 'क्योरा'वर विचारण्यात आला होता.
- यावर अनेक लोकांनी आपापली मते नोंदवली आहेत. काहींनी फोटो तर काहींनी ग्राफिक्सच्या माध्यमातून टिप्पणी दिली आहे.
- काही लोकांनी तर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी दुसर्‍या वेबसाइट्सच्या लिंक देखील शेअर केल्या आहेत. आतापर्यंत 41 हजार 400 हून जास्त लोकांनी हे पेज पाहिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...