नवी दिल्ली- तेज बहादूर यांनी लष्कराची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता भारतीय लष्कराने जवानाची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे म्हटले आहे. त्यावर जवान तेज बहादूर यांनी एका वृ्त्तवाहिनीसोबत बोलताना पलटवार केला आहे. 'मी मनोरुग्ण असेल तर लष्कराने पुरस्काराने सन्मानीत का केले होते ?' असा सवाल त्यांनी केला. माझ्यावर गैरकृत्याचा आरोप असेल तर त्यामागचे कारण देखील लष्कराला विचारा, असेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण
जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या जवानाने गौप्यस्फोट केला आहे. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यां सामान बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावे लागत, असल्याचेही या जवानाने म्हटले आहे. जवान कोण? तो कोणत्या सेक्टरमध्ये कार्यरत आहे, हे मात्र समजले नाही. दरम्यान, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले असून बीएसएफला अहवाल देण्यास सांगितले आहे.
काय म्हणाला जवान...?
- सर्व देशवासियांना नमस्कार, गुडमॉर्निंग, सलाम आणि जय हिंद. देशवासियांनो, मला एक विनंती करायची आहे. मी बीएसएफ 29 बाटालियनचा सीमा सुरक्षा दलाचा जवान आहे. आम्ही सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी पाच पर्यंत 11 तास सतत बर्फात उभे राहून देशाचे रक्षण करतो.
- कितीही बर्फ असो, पाऊस असो किंवा वादळ असो आम्ही कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता अहोरात्र उभे असतो. 'माझ्या मागचे दृष्य तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला कदाचित ते दृष्य चांगले वाटत असेल. पण आमची परिस्तिती मीडियाही दाखवत नाही आणि मंत्रीही सांगत नाहीत.
- सरकार कोणतेही असो, आमचे वाईट हाल आहेत. मी यानंतर तुम्हाला तीन व्हिडिओ पाठवेल. ते तुम्ही देशातील सर्व मीडिया आणि नेत्यांना दाखवा.
अधिकाऱ्यांवर केले गंभीर आरोप...
- जवान म्हणाला की, वरिष्ठ अधिकारी आमच्यावर खूप अन्याय, अत्याचार करतात. आम्ही कोणत्याच सरकारला दोष देत नाही. कारण, सरकार प्रत्येक वस्तू आम्हाला देते, परंतु वरिष्ठ अधिकारी सर्व विकून मोकळे होता. आमच्यापर्यंत ते काहीच येऊ देत नाहीत.
- अशी परिस्थिती आहे की, अनेकवेळा जवानांना उपाशीच झोपावे लागते. मी सकाळचा नास्ता तुम्हाला दाखवतो. एक पराठा मिळतो, त्यासोबत चटणी, लोणचे, भाजी काहीच मिळत नाही, पराठा आम्हाला चहासोबत खावा लागतो.
- दुपारचे जेवण मी तुम्हाला दाखवतो. वरणात केवळ मीठ आणि हळद असते, त्याव्यतिरिक्त काहीच नसते. चपात्या तर अतिशय निकृष्ट दर्जाच्या असतात.
- मी परत सांगतोय की, भारत सरकार सर्वकाही देते, त्यांच्याकडून सर्वकाही येते. स्टोअर भरलेले आहेत, पण सर्वकाही बाजारात विकले जाते. ते कोठे जाते? त्याची विक्री कोण करते? याचील चौकशी व्हायला हवी.
पंतप्रधानांना विनंती....
- जवानाने पुढे सांगितले की, मी आदरणीय पंतप्रधानांना विनंती करतो, याची चौकशी करावी.
- मित्रांनो, हा व्हिडिओ टाकल्यानंतर कदाचीत मी असेल किंवा नसेल. कारण या अधिकाऱ्यांचे हात खू प लांब आहेत. ते मला काहीही करु शकतात. काहीही होऊ शकते, तुम्ही विचार करा. या व्हिडिओला जास्तीत-जास्त शेअर करा. मीडियाने येथे येऊन चौकशी करावी. येथील परिस्थिती पाहावी.
- मी बाकी व्हिडिओ तुमच्याकडे देइल, सर्व डिटेल दाखवेल. जय हिंद.
बीएसएफ म्हणाले तेज बहादूर यांना समुपदेशनाची गरज
- तेज बहादूर यांच्या आरोपावर सोमवारी रात्री बीएसएफने स्पष्टीकरण देण्याऐवजी जवानाला समुपदेशनाची गरज असल्याचे म्हटले आहे.
- बीएसएफने तेज बहादुर यांच्यावर दारुबाज, अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन आणि नियमांचे पालन न करणारा जवान असा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांना बहुतेकवेळा हेडक्वॉर्टर येथेच ड्यूटी दिली जात असल्याचे सांगितले.
- बीएसएफने म्हटले आहे, तेज बहादूर यांना 10 दिवसांपूर्वीच पोस्टवर पाठवले गेले होते, समुपदेशनाचा काय परिणाम झाला हे तपासले जात होते. डीआयजी त्यांची नियमीत भेट घेत होते. त्या पोस्टवर आणखी 20 जवान आहे, परंतू त्यांची काहीही तक्रार नाही.
पुढील स्लाइडवर पाहा... BSF मधील वरिष्ठ अधिकार्यांची पोलखोल करणारा जवानाचा व्हिडिओ...