आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅटवरील कमाईत धोनीच्या पुढे गेला विराट, मिळतात 2 कोटी जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विराट कोहली खेळासोबत कमाईतही अव्वल होत चालला आहे. मैदानावरील कमाईत तो धोनीच्याही पुढे गेला आहे. बॅटवरली जाहिरातीतून धोनी 6 कोटी कमावतो तर, त्यासाठीच कोहलीला 8 कोटी रुपये दिले जातात. मात्र टीव्ही कमर्शियल आणि इतर ब्रँडच्या जाहिरातीच्या कमाईत अजून धोनीच अव्वल आहे.

अजून कशातून कोहलीला सर्वाधिक कमाई
- धोनी मैदानावर असताना त्याच्या बॅटवर स्पार्टनचा लोगो लावलेला असतो. त्यासाठी त्याला 6 कोटी रुपये मिळतात.
- विराट कोहलीच्या बॅटवर एमआरएफचा लोगो असतो. त्यासाठी त्याला 8 कोटी रुपये मिळतात.
- त्यासोबत या कंपनीचे टी-शर्ट, कॅप आणि शुजला मैदानावर प्रदर्शीत करण्यासाठी विराटला 2 कोटी रुपये मिळतात.
- टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिराती आणि ब्रँड जाहिरातीसाठी धोनीची 8 कोटी कमाई होते तर अशा जाहिरातीतून विराटला 5 कोटी मिळतात.
- एका स्पोर्टस वेअर फर्मच्या माहितीनूसार, धोनी, कोहली आणि युवराज ब्रँडिंगसाठी क्रिकेट जगतातील मोठी नावे आहेत.

धोनीची कमाई
- 2016 मधील अॅक्टिव्ह क्रिकेटर्समध्ये धोनी कमाईत अव्वल क्रमांकावर आहे.
- टोटल स्पोर्टटेक डॉट कॉमच्या माहितीनूसार, धोनी एका वर्षात 192 कोटी रुपये कमाई करतो.
- IPL आणि BCCI च्या करारातून एका वर्षात धोनी जवळपास 40 खोटी रुपये कमावतो.
पुढील स्लाइडवर पाहा, कोणता क्रिकेटर किती कमावतो
बातम्या आणखी आहेत...