आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीच्या रिट्वीटने टीम इंडियातील समन्वयावर प्रश्नचिन्ह, टीममध्ये एकटा पडला धोनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वचषकापूर्वी विराट कोहलीच्या एका ट्वीटने पुन्हा एकदा टीम इंडियातील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महेंद्र सिंग धोनीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणार्‍या डीएनएच्या अहवालावर ट्वीट केले आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी 3.15 मिनिटाने त्याने हे ट्वीट डिलिटही केले. यावरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पुन्हा काहीतरी गडबड असल्याची चर्चा आहे. या रिट्वीटनंतर पुन्हा एकदा टीम इंडियात समन्वय आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून टीम इंडियात धोनी पुन्हा एकटा पडला आहे का? अशी चर्चा होत आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा तपास करणारी मुद्गल कमिटीच्या अहवालात इंडिव्हिज्यूअल नं. २ धोनी आहे असा संशय डीएनएच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अहवालात आरोपी खेळाडूंच्या नावाऐवजी क्रमांक देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने चेन्नई सुपरकिंग्जचा गुरूनाथ मयप्पनला जेव्हा दोषी ठरवले त्याच वेळी कोहलीने हे ट्वीट केले होते.या प्रकरणात धोनीने त्याची बाजू घेतली. यापूर्वी धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने टीम इंडियातील नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडूंनी आपल्याला फोन करून श्रीनिवासन यांचे पितळ उघडे पाडल्यामुळे शुभेच्छा दिल्याचे बिहार क्रिकेट संघाचे सचिव आदित्य वर्मा यांनी दावा केला आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, काय होते कर्णधार धोनी आणि कोहलीचे ट्वीट ...