आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Visa Scam In American School, Teachers Hide Information Indian Government Allegation

अमेरिकी शाळेत व्हिसा घोटाळा; शिक्षकांनी माहिती दडवली,भारत सरकार चौकशी करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकी वकिलातीच्या उच्चभ्रू शाळेने व्हिसा घोटाळा आणि कर चुकवेगिरी केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. हा संस्थेकडून ही फसवेगिरी झाल्याचा आरोप भारताने केला आहे. या शाळेतील शिक्षिकांनी व्हिसामध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. भारतीय महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावर ठपका ठेवणा-या अमेरिकी सरकारच्या शाळेतच हा घोटाळा उघड झाल्याने अमेरिका कोडींत सापडली आहे.
वकिलातीच्या नजीक अमेरिकी सरकारची मालकी असलेल्या विस्तीर्ण परिसरात ही शाळा आहे. यामध्ये 1500 विद्यार्थी असून त्यापैकी 500 विद्यार्थी अमेरिकी आहेत. उर्वरित इतर देशांचे असून त्यात काही भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन करून या शाळेत अनेक शिक्षक ‘बेकायदा’ काम करत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. त्याशिवाय कर कायदेही पायदळी तुडवल्याची माहिती आहे. या घोटाळ्याची लवकरच चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.अमेरिकी दैनिक न्यूयॉर्क टाइम्सनेच या घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला आहे.
* कर परताव्यांतून सवलतीसाठी उपद्व्याप
* माहिती लपवण्याचा सरकारी सल्ला
करमुक्त व्हिसासाठी भारताने अमेरिकी कर्मचा-यांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. त्यामुळे शाळेत शिकवणा-या महिला शिक्षिकांना अमेरिकी सरकारनेच माहिती लपवण्याचा सल्ला दिला होता. ब-याच महिला शिक्षिकांचे पतीही याच शाळेत शिक्षक आहेत; परंतु व्हिसा अर्जात या महिलांनी ‘गृहिणी’ असा करावा असा सल्ला अमेरिकी सरकारनेच दिला होता.
* जशास तसे उत्तर
देवयानी खोब्रागडे यांच्यावरील व्हिसा प्रकरणाचा खटला मागे घेण्याची मागणी अमेरिकेने फेटाळल्यानंतर भारतानेही जशास तसे उत्तर देऊन अमेरिकेला कोंडीत पकडणे सुरू केले आहे. आधी सर्व अमेरिकी अधिका-यांना असलेले विशेष राजनैतिक संरक्षण मागे घेण्यात आले. भारतीय विमानतळांवर प्रवेशासाठी अमेरिकी अधिका-यांना देण्यात येणारे खास पासेस बंद करण्यात आले आहेत. त्याशिवाय वकिलातीच्या परिसरात सुरू असलेले विविध व्यवसाय आणि चित्रपट दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. देवयानी यांच्या मोलकरणीस व्हिसा देऊन प्रकरण उकरून काढणारा अमेरिकी अधिकारी वेन मे याची हकालपट्टी करण्यात आली आहे.
* खास पत्रक
अमेरिकी सरकारने शाळेतील कर्मचा-यांसाठी खास माहितीपत्रक काढले होते.त्यात स्पष्टपणे त्याचा उल्लेख केला आहे. एम्प्लॉयमेंट व्हिसावर सर्वसाधारणपणे पुरुष जोडीदाराचा उल्लेख केला जातो.महिलांचा गृहिणी असाच उल्लेख असतो.असे असे या माहितीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान,या प्रकरणी शाळेचे प्रशासक पॉल चेमलिक यांनी भाष्य करण्यास नकार दिला.16 शिक्षकांना भारताने कर परताव्यातून सवलत दिली आहे. मात्र, या शाळेत अनेक शिक्षक कार्यरत असून त्यांची माहिती दडवण्यात आली.
* परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रश्न उपस्थित
परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिके समोर व्हिसा घोटाळ्याचा मुद्दा उचलला आहे. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री विल्यम जे. बर्न्स आणि भारतीय राजदूत एस. जयशंकर यांची वॉशिंग्टन येथे दोन दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत उभयतांनी शिक्षकांच्या व्हिसा मुद्द्यावर चर्चा केली.