आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Viscera Report Deepens Sunanda Pushkar's Death Mystery

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यातच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास सुरूच राहील, असे सांगत या प्रकरणात सध्या एफआयआर दाखल करण्यास दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस. बासी यांनी नकार दिला.

आतापर्यंत गोळा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार कलम 174 अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे बासी यांनी सांगितले. लग्नानंतर महिलेचा सात वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास उपदंडाधिकार्‍यांमार्फत प्रकरणाची चौकशी केली जाते. याप्रकरणी 21 जानेवारी रोजी उपदंडाधिकार्‍यांनी दिल्ली पोलिसांना सुनंदा यांच्या हत्या किंवा आत्महत्येच्या दृष्टिकोनातून चौकशी करण्याचे आदेश बजावले होते. दरम्यान, सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा अहवाल देण्यात आला. या प्रकरणात काही गडबड आढळल्यास पोलिस एफआयआर दाखल करू शकतात. 52 वर्षीय सुनंदा पुष्कर 17 जानेवारीच्या रात्री दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि शशी थरूर यांच्यातील कथित प्रेमसंबंधांबाबतच्या ट्विटवरून वादंग उठल्याच्या दुसर्‍या दिवशी सुनंदा यांचा मृत्यू झाला होता.

एम्सच्या डॉक्टरांचे मत मागवणार
तपासकर्त्यांना व्हिसेरा अहवालातून विषाचा नेमका प्रकार आणि त्याचे प्रमाण हवे होते, मात्र अहवालामध्ये ते प्राप्त होऊ शकले नाही. सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल)ने दिलेल्या व्हिसेरा अहवालात विषप्राशनाचा इन्कार केला असून औषधाचा अतिरिक्त डोस मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे. सुनंदा यांचे शवविच्छेदन करणार्‍या एम्समधील डॉक्टरांचे व्हिसेरा अहवालावर मत मागवण्यात येणार आहे. उपविभागीय दंडाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.