आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwas Offensiv Or Not ? Women Commission Chairman, Members Fight Eachother

विश्वास दोषी की निर्दोष? महिला आयोगाच्या अध्यक्ष, सदस्याची आपसात जुंपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपचे नेते कुमार विश्वास मंगळवारी दिल्लीच्या महिला आयोगासमोर हजर झाले नाहीत. प्रकरण आपच्या एका महिला कार्यकर्तीच्या तक्रारीचे आहे. संबंधांच्या अफवांवर विश्वास यांच्याकडे ती स्पष्टीकरण मागत आहे. विश्वास यांना पत्नीसह दुपारी ३ वाजता बोलावण्यात आले होते. ते आले नाहीत. मग अध्यक्ष बरखा सिंह व इतर सदस्यांनी पत्रपरिषद घेतली.

सुरुवातीला बरखा म्हणाल्या, विश्वासना पुन्हा समन्स बजावू. तेव्हा शेजारी बसलेल्या जुही खान भडकल्या. म्हणाल्या, 'विश्वासविरुद्ध राजकीय कारस्थान सुरू आहे.’ त्यावर त्यांना रोखत बरखा म्हणाल्या, "नाही, नाही, थांबा. प्रकरण काय ते मी सांगते.' मग जुहींकडे इशारा करून म्हणाल्या, 'ही आपची कार्यकर्ती आहे. आयोग आपले काम करत आहे.' जुही ओरडल्या, "मी दिल्ली महिला आयोगाची सदस्य आहे.' यावर बरखा हसून म्हणाल्या, "यांना राजकारणाचा भाग म्हणून येथे धाडले आहे.' त्यांचे बोलणे तोडत जुही म्हणाल्या, "मला कोणी पाठवले नाही. मी मॅडमसोबत आले आहे.'

विश्वास क्लीन माणूस आहे. त्यांना गोवले जात आहे, असे जुही म्हणत होत्या. बरखा व जुहींचे आपसात जुंपले. बरखांनी विचारले, तू हे आप कार्यकर्ती या नात्याने बोलत आहेस की आयोगाची सदस्य? जुही उत्तरल्या, 'तुम्ही केस बघा. विश्वासविरुद्ध हरॅशमेंटची तक्रार नाही.’ त्यावर बरखा पत्रकारांना म्हणाल्या, ही केस सेटल करते आहे.

हे ऐकून जुही उभ्या ठाकल्या व "मी जुही खान, दिल्ली महिला आयोग सदस्यपदाचा या क्षणी राजीनामा देत आहे.' यावर बरखा म्हणाल्या, ‘ही राजीनामा काय देतेय, हिला पत्रपरिषद उधळण्यासाठीच पाठवलेले होते.