आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी उठाव होण्याची सत्ताधिशांना कायम भीती वाटते, माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूर- लष्करी उठाव होण्याची सत्ताधिशांना कायम भीती वाटते. त्यामुळे लष्कराला कायम दूर ठेवले जाते. लष्कराला विश्वासात न घेता महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. परंतु, भारतात लष्करी उठाव होण्याची जराही शक्यता नाही, असे खळबळजनक विधान माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी केले आहे.
व्ही. के. सिंग म्हणाले, की मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा मी स्वातंत्र्य उपभोगले. त्यापूर्वी मी पिंजऱ्यातील पोपट असल्याचा भास होत होता. देशातील वरिष्ठ नोकरदार आपले हित जपण्यासाठी काही गोष्ट सातत्याने जीवंत ठेवत असतात. परंतु, त्याचा निर्णय प्रक्रिया आणि राष्ट्रीय हितावर विपरित परिणाम होत असतो.
भारतीय लष्करातील विशेष गुप्तचर विभाग बंद करण्यासंदर्भात व्ही. के. सिंग म्हणाले, की जर भारतीय लष्करातील विशेष गुप्तचर विभाग कार्यान्वित असता सीमेवर होत असलेल्या घडामोडी झाल्या नसत्या. लष्कराने हा विभाग बंद करायला नको होता.