आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाटा वॉरमध्‍ये वोडाफोनचा प्रवेश, 250 रुपयात 1 GB रिचार्जवर मिळेल 9 GB 4 जी डाटा फ्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- रिलायन्‍स जियो च्‍या मोफत 4 जी डाटा आणि मोफत व्‍हॉईस कॉलच्‍या ऑफर्सनंतर आता दुस-या कंपन्‍याही आपल्‍या सेवा स्‍वस्‍त करत आहेत. स्‍वस्‍त डाटा वॉरमध्‍ये आता वोडाफोनने एंट्री केली आहे. कंपनीने 250 रुपयांमध्‍ये 1 जीबी 4 जी डाटा रिचार्ज केल्‍यास 9 जीबी 4 जी डाटा मोफत देण्‍याची घोषणा केली आहे. याआधी एअरटेल आणि बीएसएनएलनेही आपल्‍या सेवा स्‍वस्‍त केल्‍या आहेत.
कशी आहे वोडाफोनची सेवा..
कंपनीने म्‍हटले आहे की, 1 जीबी किंवा त्‍यापेक्षा जास्‍त रिचार्ज केल्‍यास 9 जीबीचा 4 जी डाटा फ्री दिल्‍या जाणार आहे. म्‍हणजे 250 रुपयात वोडाफोन थेट 10 जीबी 4 जी डाटा देणार आहे. ही ऑफर 90 दिवसांसाठी आहे. 26 सप्‍टेंबरपासून कंपनीची ही सेवा सुरू झाली आहे.
या सर्कलमध्‍ये मिळत आहे फ्री ऑफर..
दिल्‍ली, मुंबई, कलकत्‍ता या सर्कलमध्‍ये कस्‍टमर प्‍लानमधून दिल्‍या जाणा-या फ्री डाटा सेवेचा लाभ घेतला जाऊ शकतो. तर, उत्‍तरप्रदेश वेस्‍ट आणि ईस्‍ट, हरयाणा, कर्नाटक, गुजरात, पश्‍चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, महाराष्‍ट्र, गोवा, आसाम, नॉर्थ ईस्‍ट- स्‍टेटस् आणि राजस्‍थानमध्‍ये फ्री डाटा सेवा ही रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत वापरता येईल.
काय आहेत अटी..
या सेवेचा लाभ घेण्‍यासाठी हँडसेट हा 4 जी असायला हवा. मात्र, त्‍यावर गेल्‍या 6 महिन्‍यांपासून वोडाफोनचे सीम वापरलेले नसावे. जुने ग्राहक टीकवून नवीन ग्राहक कसे जोडता येतील यासाठी कंपनीने ही सेवा जाहीर केली आहे. या ऑफरच्‍या माध्‍यमातून वोडाफोन ग्राहक वोडाफोन प्‍लेवर मोफत टीव्‍ही, चित्रपट आणि संगीताचा लाभ घेऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...