आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vote Counting Bypoll Election 12 Seats Lucknow Latest News

उत्तर प्रदेश पोटनिवडणूक निकाल : मोदींच्या मतदारसंघात समाजवादी पक्षाला आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या 11 विधानसभा आणि मैनपुरी लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीचे निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली आहे. मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह 12 हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील रोहनिया विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे.
लखनऊ पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार जूही सिंह आघाडीवर आहेत. येथे भाजप उमेदवार गोपाल टंडन दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर, बलहा विधानसभेच्या जागेवर सप उमेदवार बंसीधर बौद्ध आघाडीवर आहेत.
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणूकीसाठी 13 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. जवळपास 53.18 टक्के मतदान झाले होते. ठाकूरद्वार येथे सर्वाधिक 69 टक्के मतदान झाले होते. नोएडामध्ये सर्वात कमी 32.04 टक्के मतदान झाले होते. समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यांनी सोडलेल्या मैनपूरी लोकसभा मतदारसंघात 56.40 टक्के मतदान झाले होते.
या मतदारसंघात पोटनिवडणूक
लखनऊ पूर्वी ( 34 टक्के)
महोबा जिल्ह्यातील चरखारी (59.50 टक्के)
बिजनौर (58 टक्के)
हमीरपुर (56.50 टक्के)
सहारनपुर नगर (54 टक्के)
खीरी जिल्ह्यातील निघासन विधानसभा (63.50 टक्के)
कौशंबी जिल्ह्यातील सिराथू (50.50 टक्के )
बहराइच जिल्ह्यातील बलहा (55 टक्के)
आणि पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसी जिल्ह्यातील रोहनिया विधानसभा मतदारसंघ (52.50 टक्के)
(कंसातील आकडे हे 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी )