आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voters Get Voting Recipt In Coming Loksabha Election

मतदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची पावती मिळणार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खुल्या आणि नि:पक्ष वातावरणातील मतदानासाठी 2014 मधील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ईव्हीएममध्ये व्होट व्हेरिफायर पेपर ऑडिट ट्रेलर (व्हीव्हीपीएटी) बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मंगळवारी दिले. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना मतदान केल्याची पावती मिळणे शक्य होणार आहे.


ईव्हीएममध्ये व्हीव्हीपीएटी बसवण्यासाठी केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मतदान यंत्रामध्ये व्हीव्हीपीएटी बसवल्यामुळे ‘खुल्या आणि नि:पक्ष’वातावरणात मतदान होईल आणि वादविवाद सोडवण्यासाठीही त्याची मदत होईल, असे सरन्यायाधीश न्या. पी. सदाशिवम आणि न्या. रंजन गोगोई यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे. ईव्हीएममध्ये पेपर ट्रेलर बसवण्यात यावे आणि मतदाराला मतदान केल्याची पावती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती. या याचिकेवरून हे निर्देश देण्यात आले आहेत.


नागालँडमध्ये प्रथम वापर,देशभरात 13 लाख यंत्रांची गरज


कशी मिळते पावती?
व्हीव्हीपीएटी यंत्रणेत मतदार जेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील (ईव्हीएम) त्याच्या पसंतीच्या उमेदवाराचे बटण दाबतो तेव्हा अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव आणि मतदान चिन्ह असलेली मतपत्रिका मुद्रित होते आणि आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची मतदार खातरजमा करू शकतो.


घोटाळ्यांना लगाम
संभाव्य निवडणूक घोटाळा किंवा ईव्हीएममधील बिघाड शोधून आपले मत अचूक उमेदवाराला पडले की नाही, याची मतदाराला खात्री पटावी म्हणून व्हीव्हीपीएटी यंत्रणा सादर करण्यात आली. ही यंत्रणा म्हणजे ईव्हीएममध्ये साठवलेल्या निकालाचे लेखापरीक्षणच आहे.


टप्या-टप्यांने बसवणार
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान केल्याची पावती द्यायची असल्यास 13 लाख व्हीव्हीपीएटी यंत्रांची आवश्यकता भासणार आहे. ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने बसवता येईल. मात्र त्यात प्रशासकीय आणि आर्थिक अडचणी आहेत, असे मत आयोगाने न्यायालयात मांडले.