आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE : मतमोजणीला सुरुवात, सर्वप्रथम पत्रमतमोजणीची पेटी उघडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सकाळी आठ वाजता देशातील चार राज्यांच्या विधानसभांच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे मतमोजणी होत आहे. मिझोराम येथे सोमवारी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे. रविवारी सकाळी आठ वाजता प्रथम पत्र मतांच्या पेट्या उघडण्यात येत आहेत. पहिला निकाल सकाळी 8.30 वाजता येण्याची शक्यता आहे. मिझोराम हे ख्रिश्चन बहुल राज्य आहे. ख्रिस्ती बांधव रविवारी मोठ्या प्रमाणात चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात त्यामुळे येथील मतमोजणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही विजयी उमेदवार मोकळ्या मनाने आनंद साजरा करु शकणार नाही. त्याचे कारण असे, की पेढे वाटणे, फटाके फोडणे आणि विजयी रॅलीचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात जोडला जाणार आहे. निवडणूक आयोग आठ डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी या सुचना जारी केल्या आहेत.
आयोगाने सर्व जिल्हा निरीभक, मायक्रो ऑब्जर्व्हर आणि व्हिडिओ पथकांना सतर्क राहाण्याच्या सुचना दिल्या आहेत. विजयी उमेदवारांकडून केल्या जाणा-या खर्चावर आयोगाची करडी नजर राहाणार आहे. एवढेच नाही तर विजयाच्या आनंदात उमेदवार मोबाइल, एसएमएस, टी.व्ही. चॅनल किंवा रेडिओ या माध्यमातून शुभेच्छा देत असेल तर हा खर्चही उमेदवाराच्या निवडणूक खर्चात जोडला जाणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा उमेदावारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 16 लाखांपर्यंत केली होती.

दरम्यान, उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये (इव्हीएम) बंद आहे.