आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting Continue In Karnataka, Long Que Of Voters Everywhere

कर्नाटक LIVE : दुपारी एक पर्यंत 26 टक्के मतदान, केंद्राबाहेर लांबच लांब रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात कर्नाटकातील सर्व 28 जागांसाठी मतदान होत आहे. कर्नाटकात दुपारी एक वाजतापर्यंत 26 टक्के मतदान झाले असून अजूनही मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसचे नंदन निलकेणी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (जद एस) आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली (काँग्रेस) या सारख्या बड्या नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. सत्ताधारी काँग्रेसची या निवडणुकीत भाजपची टक्कर आहे. कर्नाटकात आज होत असलेल्या मतदानाद्वारे 435 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यातील 195 उमेदवार अपक्ष आहेत, तर 21 महिला उमेदवार मैदानात आहेत. कर्नाटकातील 28 जागांपैकी 5 दलितांसाठी आणि 2 आदिवासींसाठी राखीव आहेत.
कशी आहे तयारी
54 हजार मतदान केंद्राद्वारे 4.62 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. या सर्व मतदान केंद्रापैकी 11,424 केंद्र अतिसंवेदनशील आणि 14,968 संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. येथे 6,072 व्हिडिओ कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
2009 ची स्थिती
2009 मध्ये कर्नाटकात भाजपने 19 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेस 6 आणि जनता दल (एस)ला 3 जागांवर विजयी मिळविता आला होता.