आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत विक्रमी 66 टक्के मतदान, केजरीवाल म्हणाले, \'आता ध्यान धारणा करणार\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता मतदान संपले. दिल्लीकरांनी यंदा विक्रमी मतदान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

दिल्लीकरांचा मतदानातील उत्साह पाहून विक्रमी मतदान होणार असा अंदाज सकाळपासून वर्तवला जात होता. या विक्रमी मतदानाचा कौल कोणाला मिळेल हे आता 8 डिसेंबरला कळणार आहे. गेल्यावेळी 52 टक्के मतदान झाले होते. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हनुमान रोड येथील नगर पालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रात मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुले देखील होती. याच मतदान केंद्रावर मुख्य निवडणूक आयुक्त विजय देव आणि त्यांच्या पत्नीनेही मतदान केले.
मतदानानंतर केजरीवाल म्हणाले, निकालाबाबत मी निश्चिंत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळणारा विजय हा माझा नसून आम जनतेचा असणार आहे. ते म्हणाले, पुढचे दोन दिवस ध्यान करणार आहे आणि 7 डिसेंबरपासून पुन्हा सक्रिय होणार आहे.
8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा आम आदमी पक्षान उडी घेतल्याने प्रत्येकवेळी होणारा दुहेरी मुकाबला यंदा बदलला आणि रोमांचक झाला आहे.