आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा : 7 राज्यांमध्ये 27 जागांवर मतदान सुरू, युपी, हरियाणात चुरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युपीमध्ये भाजप अपक्ष उमेदवार प्रीति महापात्रा यांना पाठिंबा देत आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
युपीमध्ये भाजप अपक्ष उमेदवार प्रीति महापात्रा यांना पाठिंबा देत आहे. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - राज्यसभेच्या 27 जागांचा फैसला आज होणार आहे. भाजप नेते आणि तीन विद्यमान केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारमण आणि चौधरी वीरेंद्र सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच काँग्रेस आणि दोन माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल तसेच जयराम रमेश यांच्या भवितव्याचा फैसलाही होणार आहे. नक्वी झारखंड आणइ सिब्बल युपीमधून मैदानात आहेत. चौधरी वीरेंद्र हरियाणा, सीतारमण आणि रमेश कर्नाटकातून लढत आहेत. सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत निकाल यायला सुरुवात होणार आहे. युपी आणि हरियाणामध्ये इंडिपेंडंट कँडिडेट्समुळे काट्याची टक्कर रंगणार आहे.
किती राज्यांत किती जागा
- राज्यसभेसाठी 15 राज्यांमध्ये 58 जागा रिकाम्या झाल्या होत्या. त्यापैकी 14-14 भाजप आणि काँग्रेसच्या होत्या.
- 7 जागा सपा, 5 जदयू, 3-3 बीजेडी आणि एआईएडीएमकेमधील आहेत.
- 2-2 जागा बसपा, डीएमके, एनसीपी आणि टीडीपी तसेच 1-1 जागा वायएसआर काँग्रेस, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल यांच्या आहेत.
- 8 राज्यांतून 31 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
- 7 राज्यांतील 28 जागांवर मतदान होत आहे.
- 3 केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू, पीयूष गोयल आणि सुरेश प्रभु बिनविरोध निवडून आले आहेत.

या राज्यांमध्ये मतदान
राज्य राज्यसभेच्या जागा
यूपी 11
राजस्थान 4
कर्नाटक 4
मध्य प्रदेश 3
झारखंड 2
हरियाणा 2
उत्तराखंड 1
बातम्या आणखी आहेत...