आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंकय्या नायडू स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले उपराष्ट्रपती - मोदी, वाचा-आझाद काय म्हणाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यंकय्या नायडूंनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण केली त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत. - Divya Marathi
व्यंकय्या नायडूंनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण केली त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत.
नवी दिल्ली - व्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती झाले असून त्यांनी राज्यसभा सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर 11 वाजता ते राज्यसभेत पोहोचले आणि सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, व्यंकय्या नायडू हे देशाचे असे पहिले उपराष्ट्रपती आहेत, जे स्वतंत्र भारतात जन्मलेले आहे. 5 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली होती. नायडूंनी यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता. गुरुवारी हमिद अन्सारी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाचा अखेरचा दिवस होता. 
 
मोदी म्हणाले, व्यंकय्या नायडू हे विद्यार्थी दशेतच आंदोलनात सहभागी झाले. जेपी आंदोलनातून ते राजकारणात आले. एक शेतकऱ्याचा मुलगा आज उपराष्ट्रपती झाला आहे. अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम करत आलो आहे. त्यांचा ओढा हा कायम ग्रामीण विकासावर राहिला आहे. 
- मंत्रिमंडळात ते शहर विकास मंत्री होते, मात्र ग्रामीण भागाच्या विकासासाठी काय करता येईल याचे कायम इनपूट देत राहिले. ग्रामीण विकास हा त्यांचा आवडता विषय राहिला आहे. त्यांची पार्श्वभूमी ही ग्रामीण जीवन राहिली असल्याने कदाचित त्यांना याबद्दलची अधिक आस राहिली असली पाहिजे. 
 
पंतप्रधान ग्रामीण सडक योजना ही नायडूंची देण 
- मोदी म्हणाले, पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेची कल्पना ही व्यंकय्या नायडूंची होती. ते तेलगू भाषेत भाषण करतात तेव्हा एखादी सुपरफास्ट चालली आहे असे वाटते. 
 
विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी या शब्दात केले नायडूंचे स्वागत 
- उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. व्यंकय्या नायडूंनी शुक्रवारी सभापती पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतात विरोधीपक्ष नेता गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत भाषण केले.
- आझाद म्हणाले, हे पद निष्पक्ष निर्णय घेणारे आहे. व्यंकय्या नायडू या सभागृहासाठी नवे नाहीत. ते खासदार, मंत्री म्हणून या सभागृहात राहिले आहेत. त्यांचा या सभागृहाचा मोठा अनुभव राहिला आहे. आता ते कोणत्याही पक्षाचे नाही, तर सभापती म्हणून निष्पक्ष निर्णय घ्यायचे आहेत. 
- उपराष्ट्रपतींच्या स्वागतात विरोधीपक्ष नेता गुलाम नबी आझाद म्हणाले, सामान्य घरातील, ग्रामीण भागातील लोक आज मोठ-मोठ्या पदांवर विराजमान होत आहेत. त्यामागे त्यांची मेहनत असते, त्यासोबतच मोठा सहभाग आहे या देशातील लोकशाही आणि संविधानाच्या ताकदीचा, हे आम्ही विसरले नाही पाहिजे. 
- आझाद म्हणाले, 'भारतीय संविधानामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, आर्मी जनरल, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधिश, न्यायाधिश हे कोणीही होऊ शकते. यासाठी स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिलेल्या नेत्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे.'
- आझाद यांनी व्यंकय्या नायडू यांना दीर्घायूष्य आणि चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. 
 
UPDATES 
- शुक्रवारी सकाळी व्यंकय्या नायडू डीडीयू पार्क येथे पोहोचले. त्यांनी पंडित दीन द्याल उपाध्याय यांच्या स्मारकाला वंदन केले. 
त्यानंतर ते पटेल चौकात गेले, तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
 
राजकीय लाभासाठीच अल्पसंख्याक मुद्द्याचा वापर : व्यंकय्या नायडू 
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, ‘काही लोक राजकीय लाभासाठी अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित करत असतात. भारतच खऱ्या अर्थाने सर्वात सहिष्णू देश आहे.’ राजकारणात दुर्दैवाने ‘३ सी’ अर्थात कॅश, कास्ट आणि कम्युनिटीचाच बोलबाला आहे. वास्तविक याऐवजी चरित्र, क्षमता, दक्षता आणि आचारण या ‘४ सी’ असायला हव्यात. 
 
का म्हणाले नायडू असे...
दहा वर्षे उपराष्ट्रपती राहिलेले हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ गुरुवारी समाप्त झाला. त्यांच्या जागी शुक्रवारी व्यंकय्या नायडूंनी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 80 वर्षीय अन्सारी यांनी निरोपाच्या पूर्वसंध्येला सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘देशात मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. अल्पसंख्याकांना किती सुरक्षित वातावरण आहे यावरच लोकशाहीची ओळख निर्माण होत असते.’ अन्सारी यांच्या वक्तव्याने नवा वाद उद््भवला आहे. 
 
25 वर्षांत सर्वाधिक मतांनी विजयी झाले व्यंकय्या नायडू 
- उपराष्ट्रपती निवडणुकीत नायडू गेल्या 25 वर्षांतील सर्वात मोठ्या फरकाने विजय झाले आहेत. 
- याआधी 1992 मध्ये के.आर. नारायणन यांना 701  पैकी 700 मते मिळाली होती. नायडू देशाचे 15 वे उपरराष्ट्रपती झाले आहेत. वास्तविक या पदावर विराजमान होणारे ते 13वे उपरराष्ट्रपती आहेत. 
 
कोणाला किती मते 
- लोकसभेत 545 खासदार आहेत, मात्र दोन जागा रिक्त आहे. तर, भाजप खासदार छेदी पासवान यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे 542 खासदारांनी मताच्या अधिकाराचा वापर केला. तर, राज्यसभेत 245 खासदार आहे, तिथे दोन जागा रिक्त आहे. 
- अशा प्रकारे एकूण 785 (542+243) खासदारांपैकी 771 खासदारांनी मतदान केले. 14 खासदारांनी मतदान केले नाही. 11 मते अवैध ठरली. 
- त्यामुळे 760 मते वैध ठरले. त्यापैकी नायडूंना 516 आणि गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली. निवडणुकीत विजयी होण्यासाठी 381 मतांची गरज होती. 
बातम्या आणखी आहेत...