आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टा वेस्टलँड : पैसे घेतल्याची त्यागींच्या चुलत भावाची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांचे चुलत भाऊ संजीवने कार्लो गेरोसा आणि गाईडो हॅश्के या दोन मध्यस्थांकडून पैशांची देवाण-घेवाण झाल्याची कबुली दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. सीबीआयने त्यागींचे तीन चुलत भाऊ संजीव, संदीप आणि राजीव त्यागी यांची शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.

माजी हवाई दल प्रमुखांसोबत मालमत्तेबाबत सौदेबाजीचीही कबुली संजीव त्यागीने दिल्याचा दावा सीबीआय सूत्रांचा आहे. दरम्यान, सीबीआय सोमवारी पुन्हा एकदा एस. पी. त्यागींची चौकशी करणार आहे.

केजरीवालांचे आरोप : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मोदी सरकार व काँग्रेसवर हल्लाबोल केला. सोनियांना अटक करण्यासाठी मोदी पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. भ्रष्टाचाराबाबत दोन्ही पक्षांचे संगनमत आहे. तुम्ही त्यांना (सोनिया गांधींना) तुरुंगात पाठवले असते तर आमचीही छाती ५६ इंचांची झाली असती. पण मोदीजी, तुम्ही त्यांना का घाबरता हे मला माहीत आहे.’
बातम्या आणखी आहेत...