आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vyapam Scam Investigation To CBI, Governor May Remove

व्यापमं घोटाळ्याचा तपास सीबीअायकडे, राज्यपालांची गच्छंती अटळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठा मानला जाणारा मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा अखेर सीबीआयच्या तंबूत गेला. घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सीबीआयकडे सोपवली. सोमवारपर्यंत चौकशी सुरू करण्याचे आदेशही दिले. तथापि, त्यावर कोर्टाची देखरेख असेल किंवा नाही हे २४ रोजी स्पष्ट होईल. दुस-या एका याचिकेत कोर्टाने राज्यपाल रामनरेश यादव यांना हटवण्याच्या मागणीवर केंद्र राज्य सरकारला नोटीस बजावली. चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. राज्यपालांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. इतर दोन याचिकांवर नंतर सुनावणी होईल.

कोर्टरूम लाइव्ह, मुद्द्यांवर युक्तिवाद
नंतर मृत्यूंवर चर्चा : दिग्विजययांचे वकील सिब्बल म्हणाले, घोटाळ्याशी संबंधित ४८ लोकांचा आजवर मृत्यू झाला असून रोज एकाचा तरी प्राण जात आहे.
पीठाने सांगितले, याचिकेततर मृत्यूचा आकडा ३६ लिहिला आहे. निश्चिंत राहा. आता मृत्यूचा आकडा ३६ वरून ३८ होऊ देणार नाही, असे काेर्टाने म्हटले अाहे.
आधी केस ट्रान्सफरची गोष्ट : महाधिवक्तारोहतगी यांनी युक्तिवाद सुरू केला. म्हणाले, घाेटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याबाबत मध्य प्रदेश सरकारला काही अडचण नाही.
पीठाने सांगितले : आम्हीविधानाचे स्वागत करतो. त्यामुळे घोटाळ्याशी संबंधित गुन्हे तक्रारी संबंधित लोकांच्या मृत्यूचा तपास सीबीआयला दिला जात आहे.
राज्यपालांनाच नोटीस आल्याने गृहमंत्री राजनाथ राष्ट्रपतींना भेटले. राज्यपाल स्वत:हून राजीनामा देतील, अशी सरकारला आशा आहे. अन्यथा मोदी मायदेशी अाल्यावर निर्णय होईल.